उच्च पेन्शनसाठी अर्जाची अंतिम मुदत
ईपीएफओने सदस्यांना उच्च पेन्शन योजनेत अर्ज करण्यासाठी ३ मे ही अंतिम मुदत निश्चित केली असून आतापर्यंत ही तारीख आणखी वाढवण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. दरम्यान, १ सप्टेंबर २०१४ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ घेता येईल. आणि त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शनची सुविधा मिळणार नाही.
ईपीएफओने याआधी पेन्शन फंडात केवळ १५,००० रुपये उत्पन्नाची मर्यादा ठेवली होती, जी रद्द करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ईपीएफओने देखील कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेत ही मर्यादा रद्द केली. सर्वोच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात पात्र खातेधारकांना अर्जासाठी ४ महिन्यांची मुदत दिली होती, ज्याची मुदत ३ मार्च रोजी संपली. मात्र, पेन्शन नियामकने मुदत आणखी ३ मे पर्यंत वाढवली.
उच्च पेन्शनसाठी अर्ज कसा करायचा?
इच्छूक सदस्य EPFO वेबसाइटला भेट देऊन भरीव पेन्शनसाठी अर्ज करू शकतात. इथे तुम्हाला UAN, नाव, जन्म तारीख, आधार क्रमांक, आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल. यानंतर लिंक थोरायझेशन पिन मिळेल ज्याद्वारे तुम्ही अर्ज सबमिट करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की ईपीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज उपलब्ध आहे मात्र ईपीएसच्या रकमेवर अशी कोणतीही तरतूद नाही.
जास्त पेन्शन निवडण्याचा मोठा तोटा
जर तुम्हाला उच्च पेन्शन हवी असल्यास लक्षात घ्या की वाढीव पेन्शन फंड आयकर अंतर्गत येतो म्हणजेच एक प्रकारे तो पगारच मानला जाईल. अशा स्थितीत त्यावर आयकर स्लॅबनुसार कराची तरतूद असू जर तुम्ही आयकर कक्षेत आलात तर तुम्हाला कर भरावा लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही उच्च पेन्शन निवडली नाही, तर तुमचा EPF फंड पूर्णपणे करमुक्त राहील. म्हणजेच तुम्हाला जुन्या पद्धतीत कर भरावा लागणार नाही.
शिक्षक संपामुळे लेकरांचं नुकसान; शेवटी ग्रामस्थच झाले शिक्षक, पद्मश्री पोपटराव पवारांचं स्तुत्य पाऊल