सार्वजनिक जीवनात आणखी काम करायचंय. लोकांनी आतापर्यंत साथ दिली, त्याबद्दल त्यांचे आभार, लोकांच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन, असं शरद पवार यांनी आश्वस्त केलं. दुसरीकडे शरद पवार यांच्या निवृत्तीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. साहेब आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

 

Sharad Pawar Big Announcement he will retire from NCP President Postat Lok Majhe Sangati Republication
शरद पवार (अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस)
मुंबई : गेल्या ६० वर्षांपासून देशाच्या राजकारणात शरद पवार नावाचं घोंघावणारं वादळ आता संसदीय राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सूचकपणे शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली. १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असं सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असं पवार म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here