मुंबई: पहाटे चारच्या सुमारास नाश्त्यासाठी येणाऱ्या कॉलमुळे पोलिसांना संशय आला. दररोज पहाटेच्या वेळी येणाऱ्या कॉलमुळे पोलिसांचा संशय वाढला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पहाटेच्या सुमारास रिसॉर्टमधून इतक्या मोठ्या प्रमाणात नाश्त्याची ऑर्डर कशी येते, ती कोण करतं, याची उत्तरं पोलीस शोधत होते. अखेर पोलिसांनी रिसॉर्टवर धाड टाकली आणि बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला.खबऱ्यानं दिलेल्या टिपच्या आधारे बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्याच्या वृत्ताला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला. पहाटे चारच्या सुमारास चहा आणि नाश्ताची मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली जायची. मुंबईबाहेर असलेल्या विरारमधील राजोडी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या इमारतीमधून बोगस कॉल सेंटर सुरू होतं. सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी बाहेरच्या लोकांशी संपर्क साधू नये, यासाठी त्यांना इमारत सोडण्याची परवानगी नव्हती.
कॉलेज करता करता लग्नात पार्ट-टाईम केटरिंग काम; जेवण वाढताना रसमच्या कढईत पडून करुण अंत
दररोज पहाटे चारच्या सुमारास इमारतीमधून मोठ्या प्रमाणात चहा आणि नाश्त्याची ऑर्डर केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ‘बीच रिसॉर्टमध्ये वीकेंडला गर्दी असते. पण सोमवार ते शुक्रवार दरम्यान रिसॉर्टमध्ये फारसं कोणीच नसतं. तरीही इथून दररोज पहाटे ५० ते ६० चहा आणि नाश्त्याची ऑर्डर केली जायची. अनेक दिवस जवळच्या हॉटेलमधून अशा पद्धतीनं मोठी ऑर्डर केली जात होती. त्यामुळे संशय वाढला आणि आम्ही त्या रिसॉर्टवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली,’ अशी माहिती पोलीस अधिकारी सुहास बावचे यांनी दिली.

काही दिवस टेहळणी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी धाड टाकली. ११ एप्रिलला पोलिसांनी छापा टाकून मालकासह ४७ जणांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इमारतीत सापडलेल्या संगणकांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे. या ठिकाणी तरुणांना ऑस्ट्रेलियन बँक ग्राहकांचे कॉल उचलण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं.
VIDEO: जगायचं नाही! जीव द्यायला तरुण नदी पुलावर चढला; पोलिसानं जीव धोक्यात घातला अन् मग…
परदेशी बँक ग्राहकांची वैयक्तिक, गोपनीय माहिती काढण्याचं, त्यांच्याकडून ओटीपी मिळवण्याचं काम बोगस कॉल सेंटरमधील तरुण करायचे. ही माहिती ईमेलच्या माध्यमातून व्यवस्थापकांना द्यायचे. ‘सध्याची कारवाई हिमनगाचं टोक ठरू शकते. आम्ही या रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शन्सचा तपास करत आहोत,’ असं पोलिसांनी सांगितलं.

3 COMMENTS

  1. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. possibly but thank god, I had no issues. for example the received item in a timely matter, they are in new condition. manner in which so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    authentic cheap jordans https://www.realjordansretro.com/

  2. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or maybe but thank god, I had no issues. most notably received item in a timely matter, they are in new condition. in any event so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap louis vuitton outlet https://www.louisvuittonsoutletonline.com/

  3. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. along with but thank god, I had no issues. such as received item in a timely matter, they are in new condition. either way so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap jordans online https://www.cheapauthenticjordans.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here