मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठाण येथील कार्यक्रमात जाहीर केलं. यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना शरद पवार यांच्या निर्णयानं धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगाच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र आणण्यामध्ये मोठी भूमिका बजावलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगितली आहे.

संजय राऊत यांना बाळासाहेबांची आठवण

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. हा निर्णय समजताच संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका निर्णयाची आठवण जागवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, जनरेट्यामुळं त्यांना माघार घ्यायला लागली होती, असं संजय राऊत म्हणाले.

साहेब असं करू नका, कुणाच्या याचना, कुणाच्या विनंत्या, कुणी पाया पडलं.. चव्हाण सेंटरमध्ये काय घडलं?

संजय राऊत काय म्हणाले?

एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

अध्यक्षपदावरुन निवृत्त होतोय, राष्ट्रवादीचं पुढं काय करायचं, समितीनं ठरवावं, शरद पवारांनी नावं सुचवली

निर्णय मागं घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते कार्यकर्त्यांचा आग्रह

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर सभागृहातील नेते कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. यावेळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शरद पवार यांना निर्णय मागं घेण्याचं आवाहन केलं. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, छगन भुजबळ,प्रफुल पटेल, सुनील तटकरे, अंकुश काकडे, हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व नेत्यांनी निर्णय मागं घेण्याचं आवाहन केलं. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

भाकरी फिरवण्याची सुरुवात स्वत:पासून, निवडणुकीला उभे राहणार नाही, अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार : शरद पवार

3 COMMENTS

  1. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. aka but thank god, I had no issues. themselves received item in a timely matter, they are in new condition. no matter what so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    jordans for cheap https://www.realjordansshoes.com/

  2. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or but thank god, I had no issues. like received item in a timely matter, they are in new condition. you ultimately choose so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap jordans online https://www.cheapjordanssneakers.com/

  3. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or perhaps even but thank god, I had no issues. similar to received item in a timely matter, they are in new condition. either way so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap louis vuitton online https://www.louisvuittonsoutletonline.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here