ठाणे: तृतीयपंथीचा त्याच्याच लिव्ह इन पार्टनरने अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. येथे एका ३० वर्षीय तृतीपंथीला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. मंगळवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसांनी लिव्ह इन पार्टनरवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी बोलताना भिवंडी नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी यांनी सांगितलं की, दोन तृतीयपंथी यांच्यात प्रेमसंबंध होते, ते दोघे गॅबी नगर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. दोघांमध्ये नेहमीच किरकोळ कारणांवरुन भांडण होत राहायचं. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारासही त्यांच्यात भांडण झालं. मात्र, त्यानंतर या भांडणाचं मारामारीत रुपांतर झालं. ज्यामध्ये एका तृतीयपंथीने आपल्या पार्टनरवर फरशीने वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

इतका उष्मा की एसीशिवाय जिवंत राहाणं अशक्य, घरात सापडताहेत मृतदेह…
परिसरातील दुसऱ्या एका ट्रान्सजेंडरने सांगितले की, सोमवारी झालेल्या भांडणात शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोघींनी ही त्यांची वैयक्तिक बाब असल्याचं सांगून त्यांना तेथून जायला सांगितलं. त्यानंतर ही भयंकर घटना घडली. भांडणातूनच एका पार्टनरने दुसऱ्यावर थेट फरशीनेवार केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी लिव्ह इन पार्टनरवर गुन्हा दाखल केला आहे.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

दुसरीकडे, शनिवारी (२९ एप्रिल) संध्याकाळी मुंबईतील मानखुर्द भागात एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपी पिता-पुत्राला अटक केली होती. मृत महिला आणि आरोपी दोघेही शेजारी असून गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही कुटुंबात भांडण सुरू होते अशी माहिती आहे. त्यातूनच या महिलेची हत्या करण्यात आली होती.

गुळाचा गोळा समजून बॉम्ब फोडला, आवाजाने अख्खा परिसर हादरला, महिला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here