– त्यानंतर जवळपास १२.३० वाजता शरद पवार भाषणासाठी उभे राहिले. लोक माझा सांगाती या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी पवारांनी सर्वात मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा त्यांनी केली. तसंच त्यांच्या राजनाम्यानंतर पुढे कोण समिती असेल हेदेखील त्यांनी सांगितलं.
– १२.४५ वाजता पवारांनी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे असं म्हणत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलं. निवृत्ती घेतली असली तर शेती, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा यात अधिक काम करण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले.
– १२.५२ वाजता पवारांचं भाषण संपलं आणि ते व्यासपिठावर बसले आणि पवाराच्या या घोषणेनंतर सभागृहात एकच गोंघळ सुरू झाला.
– पवारांची ही घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सर्व पदाधिकारी, नेते मंडळी यांच्यासाठीही धक्कादायक होती.
– सभागृहात पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आणि एकच घोषणाबाजी सुरू केली. कित्येक वेळ या घोषणाबाजी सुरू होत्या. पवारांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत सभागृह सोडणार नसल्याची भूमिका घेतली.
– १२. ५५ वाजता हळूहळू एक-एक नेते, पदाधिकारी व्यासपिठावर येऊन पवारांना हा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करू लागले. अनेक कार्यकर्त्ये, पदाधिकाऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. शरद पवारांभोवती सर्वांनी एकच गराडा घातला.
– महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशी घोषणाबाजी सभागृहात सुरू होती.
– कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. काही वेळ हा गोंधळ असाच सुरू होता. त्यानंतर अजित पवार यांनी सर्वांना खाली उतरण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी, त्यांना आवरण्यासाठी अजित पवार पुढे येत विनंती करत होते.
– यावेळी जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांना आवर घालताना अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले असल्याचंही पाहायला मिळालं.
– अनेक नेत्यांनी व्यासपिठावरुन पवारांनी त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.
– १३.१४ वाजता अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सर्वांना समिती ठरवेल ते पवारांना मान्य असेल असंही सांगितलं. मात्र तरीही कार्यकर्त्ये पवारांनी आताच निर्णय घ्यावा अशी गळ घातली.
– जवळपास साडे बारा वाजता शरद पवारांचं भाषण संपलं तेव्हापासून पुढे जवळपास एक तास पवार काहीही बोलले नाहीत. अनेक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे बडे नेते, पदाधिकारी सर्वच जण पवारांना निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करत होते.
– बराच वेळ पवारांच्या बाजूला बसलेल्या जयंत पाटील यांनी १.३० वाजता त्यांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
– १.४५ वाजता पवारांनी माईक हातात घेतला आणि सर्वांना मी केवळ पदावरुन निवृत्त होत असल्याचं म्हटलं. मात्र मी तुमच्या सर्वांसोबत आहे. तुमच्या सर्व कामांसाठी सोबत असल्याचं ते म्हणाले.
– त्यानंतरही कार्यकर्त्ये पवारांनी निर्णय बदलण्याचा आग्रह करत होते. त्यानंतर दोन वाजता अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयाचं समर्थन करत, कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. साहेब निर्णय बदलणार नाहीत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
– अजित दादांनी कार्यकर्त्यांना झापल्यानंतरही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी तसंच शरद पवारांनी आपला निर्णय बदलण्याची मागणी सुरुच होती. त्यानंतर २.१५ वाजता प्रफुल्ल पटेल यांनीही कार्यकर्त्यांना विनंती केली.
– त्यानंतरही बराच वेळ घोषणाबाजी सुरू होती. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
– त्यानंतर सर्व नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा करुन तुमच्या मनातला निर्णय घेऊ, तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर तब्बल साडे तीन तासांनी शरद पवारांनी सभागृह सोडलं.