पुणे : खेळता खेळता दीड वर्षाचा चिमुकला शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी देखील तळ्यात उडी टाकली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडू लागले, पोटच्या मुलाला आणि पतीला बुडताना पाहून महिलेनेही पाण्यात उडी घेतली. यावेळी ती सुद्धा बुडू लागली. महिलेने आरडाओरड केली असता, आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीला धावले. त्यांनी महिलेला सुखरुप पाण्याबाहेर काढले.

मात्र, या घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्यासह वडिलांचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्याच्या जवळील पंचतळे परिसरातील आहे. रविवारी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. सत्यवान शिवाजी गाजरे (वय २५) आणि राजवंश सत्यवान गाजरे (वय दीड वर्षे) अशी बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय, फडणवीसांची सावध प्रतिक्रिया, मोठी घोषणाही केली!
स्नेहल सत्यवान गाजरे यांना स्थानिक तरुणांनी तातडीने तळ्यातून बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सत्यवान गाजरे यांच्या वडिलांच्या नावे जांबूतजवळ पंचतळे येथे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र आणि मंगल कार्यालय असून, मागील बाजूस जवळपास २० फूट खोल शेततळे आहे.

सोमवारी सायंकाळी ४ वाचेच्या सुमारास सत्यवान पत्नी स्नेहल आणि मुलगा राजवंश याच्यासह या कृषी पर्यटन केंद्रात आले होते. यावेळी फेरफटका मारत असताना राजवंश नजर चुकवून खेळता खेळता शेततळ्यात पडला. ते पाहून सत्यवान यांनी त्याला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने ते देखील बुडू लागले. त्यावेळी शेततळ्याकडे धाव घेतलेल्या स्नेहल यांनी मदतीसाठी आरडोओरड करत पती आणि मुलाला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. दरम्यान, त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने हॉटेलवर असलेले सत्यवान यांचे बंधू किरण गाजरे, प्रवीण गाजरे आणि हॉटेलमधील कामगारांनी तळ्याकडे धाव घेतली.

इतर स्थानिक तरूणांच्या मदतीने तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले. तेव्हा तिघेही बेशुद्धावस्थेत होते. त्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर सत्यवान आणि राजवंश यांना मृत घोषित केले.

नवीन उल हकने Virat Kohli सोडा आफ्रिदीशी घेतला होता पंगा, त्यावेळी काय घडलं होतं पाहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here