अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पद सोडण्याच्या निर्णयावर राज्यभरातील कार्यकर्ते आक्रमक होऊन निर्णय मागे घेण्याची मागणी करीत आहेत. मुंबईत अनेक नेत्यांची आश्रू गाळले तर कार्यकर्ते आंदोलनाला बसले आहेत. अशा परिस्थितीत पवार यांचे कट्टर समर्थक पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मात्र आशावाद व्यक्त केला आहे. “साहेब आमचे दैवत आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना ते नक्की समजून घेतील आणि आपला निर्णय बदलतील”, असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला आहे.
पारनेरचे आमदार लंके हे पवार कुटुंबियांचे नीकटवर्तीय मानले जातात. पारनेरमध्ये आयोजित अनेक कार्यक्रमांना स्वत: पवार यांनीही हजेरी लावली आहे. लंके पवार यांना आपले दैवत मानतात. पवार यांनी आज पद सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावर बोलताना लंके म्हणाले, “पवार यांनी आज घेतलेला निर्णय एकदम धक्कादायक आहे. तो चुकीचा असल्याचे मला म्हणता येणार नाही. कारण त्यांचा निर्णय आमच्यासाठी परमेश्वराचा निर्णय असल्यासारखे असते”

“हा निर्णय धक्कादायक असला तरी आमची आमच्या दैवतावर मनापासून श्रद्धा आहे. त्यांना यापासून परावृत्त होण्यास आम्ही नक्कीच साकडे घालू. शरद पवार ही आमच्यासाठी वेगळी शक्ती आहे. त्यामुळे त्यांच्याशिवाय पक्षाची वाटचाल करायची याचा आम्ही विचारच करू शकत नाही. एवढे सगळे नेते आणि कार्यकर्ते मनधरणी करीत आहेत, त्यामुळे पवार यांनाही कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करावीच लागेल. त्यांनी आतापर्यंतचे आयुष्य कार्यकर्ते आणि समाजासाठी खर्च केले आहे. त्यामुळे मला विश्वास वाटतो की कार्यकर्त्यांचा अग्रह म्हणून त्यांच्या भावनांचा विचार करून पवार आपल्या निर्णयापासून दोन पावले मागे घेतील. त्यासाठी आम्ही अग्रह करीत राहू”, असेही लंके म्हणाले.