साताराः साताराः करोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आहे. आपल्या देशातही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एक छोटेसे अद्यावत रुग्णालयाची निर्मिती करुन ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे. असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी केलं आहे. कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आरोग्य मंत्री श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली तर खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती सातारा-कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भात आढावा बैठक आज संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते

करोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आपला देश राज्य नक्की कोरोना मुक्त होईल, असा विश्वास शरद पवार यांनी या बैठकीत व्यक्त केला.

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे. तसंच प्रत्येक करोना रुग्णांमागे कमीत कमी १५ निकट रहिवाशांची टेस्ट केली पाहिजे. यामुळे करोना संसर्ग आटोक्यात येईल. तसेच या जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या.

करोना चाचणीच्या अहवालाला २ ते ३ दिवस लागत आहेत, त्यामुळे बाधितावर उपचार करण्यास उशीर होत आहे, त्यामुळं संबंधिताचा नमुना घेतल्यानंतर त्याचा अहवाल हा २४ तासांत प्राप्त झाला पाहिजे म्हणजे रुग्णावर वेळेत उपचार करता येतील. राज्यशासन येत्या काही दिवसात ५०० रुग्णवाहिका खरेदी करणार असून त्यांचे वाटप राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांना करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये फिजीशयनची कमतरता आहे तरी खासगी हॉस्पीटलच्या फिजीशीयनची सेवा करोना रुग्णांसाठी घ्यावी, त्यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून ६ ते ७ दिवस कोविड रुग्णालयांमध्ये काम करावे, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

वाचाः

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंर्तत कोल्हापूर जिल्ह्यात ४५ रुग्णालये व सातारा जिल्ह्यातील २७ रुग्णालये आहेत, या रुग्णालयांमध्ये कोरोना संसर्गावर सर्वांसाठी मोफत उपचार केले जात आहेत. कुठले रुग्णालय पैसे घेत असले तर त्या रुग्णालयावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी, अशा सूचना करुन येत्या एक- दोन दिवसात सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे करोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. करोनाचे काही रुग्ण हे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत काही रुग्णालये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने देयक रुग्णांकडून अदा करुन घेत आहेत, अशा काही तक्रारी येत आहेत सातारा व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय विभागांमध्ये जे ऑडीटर असतात त्यांची नेमुणक करुन त्यांच्यामार्फत देयक तपासणी करुन ते संबंधित रुग्णाला देण्यात यावे. तसेच भरारी पथकाचीही नेमणूक करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील जागा रिक्त आहेत त्या जागा भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत तरी त्यांनी ज्या रिक्त जागा आहेत त्या तात्काळ भराव्यात. इतर आजारांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना उपचार करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत, अशा तक्रारी येत आहेत, अशा रुग्णालयांवर जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी. असे आदेश राजशे टोपे यांनी यावेळी दिले आहेत.

वाचाः

मुंबईच्या धर्तीवर डॅशबोर्ड तयार करावा

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील एकही करोना बाधित हा रुग्णालयातील बेडपासून वंचित राहू नये यासाठी सातारा व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने डॅशबोर्ड तयार करावा. या डॅशबोर्डमुळे कुठल्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे याची माहिती सहज उपलब्ध होते त्यामुळे बाधिताला वेळेत उपचार करता येतील. जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here