नवी दिल्लीः गौतम बुद्धांच्या मुद्द्यावरून भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या वक्तव्यावर नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. गौतम बुद्धांवरील प्रकरण शंका आणि वादाच्या पलिकडे आहे. यामुळे हा वादाचा विषय होऊ शकत नाही. बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये झाला होता असं पंतप्रधान मोदींही म्हणाले होते, असं नेपाळचं म्हणणं आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर आपली भूमिका स्पष्ट केलीय. बुद्ध हे सामायिक वारशाचा भाग आहेत त्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला होता. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. यात काहीच शंका नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले.

नेपाळनंतर बौद्ध धर्म जगातील इतर भागांमध्ये पसरला हे सत्य आहे. हे प्रकरण शंका आणि वादाच्या पलिकडे आहे. म्हणूनच हा वादाचा विषय होऊ शकत नाही. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला याची कल्पना आहे. नेपाळ हा शांतता प्रिय देश आहे. जिथे बुद्धांचा जन्म झाला, असं २०१४ च्या नेपाळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, असं नेपाळने म्हटलंय.

गौतम बुद्ध भारतीय आहेत, असं अलिकडेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते. जयशंकर यांनी केलेल्या वक्तव्यावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. मात्र, यापूर्वी नेपाळने प्रभू रामच्या नावाने वाद वाढवला आहे. प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान हे नेपाळमध्ये असल्याचा दावा नेपाळने केला होता.

राम जन्मस्थळावरून वाद

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी नेपाळमधील थोरीजवळ अयोध्यापुरी येथे प्रभू राम यांचे जन्मस्थान असल्याचा दावा केला होता. रामाचे खरे जन्मस्थान नेपाळमध्येच आहे. सांस्कृतिक अतिक्रमण करताना भारत खोट्या तथ्यांच्या आधारे उत्तर प्रदेशातील अयोध्याला राम यांचे मूळ जन्मस्थान असल्याचा दावा करत आहे, असं ओली म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here