म. टा. प्रतिनिधी, जळगाव: मराठी अस्मितेसंदर्भात कर्नाटक सरकारची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिली आहे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटवून कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा आपली पातळी सिद्ध केली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू शकतात, पण शिवरायांना मनातून कसं काढणार, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी कर्नाटक सरकरवर टीका केली आहे.

जळगावात रविवारी दुपारी कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी कर्नाटक सरकारचा समाचार घेतला. या विषयावर गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते पुढे म्हणाले की, या जगात जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आहेत; तोपर्यंत आहेत. त्यामुळे पुतळा हटवला म्हणजे, फार मोठं काम केले असे नाही. शिवरायांचा पुतळा हटवून कर्नाटक सरकारने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीत जाऊन समोरच्यांना नतमस्तक व्हायला लावले तर कर्नाटक काय आहे? अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वाचाः

दरम्यान, कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. तर, मणगुत्ती गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी,पंच मंडळी यांची बैठक पार पडली असून आठ दिवसांत एकमेकांच्या सहमतीने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी
माजी मुख्यमंत्री आणि खासदार यांनी ‘नाणार’ प्रकल्पाबाबत शिवसेनेवर केलेल्या टीकेचा देखील गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला. नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करून स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते. स्वतः मुख्यमंत्री असताना ते कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. ते जर असे काही बोलले नाहीत तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही, असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी राणेंना काढला.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here