मोरेगाव (ता. सेलू, जि. परभणी) येथील ५९ वर्षीय पुरुष रुग्णाला २ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या अहावालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा शनिवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजता मृत्यू झाला. जिल्ह्यातील काटेपिंपळगाव येथील ६६ वर्षीय महिला रुग्णाला २२ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले असतानाच रुग्णाचा शनिवारी दुपारी चार वाजता मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णाला ५ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले असतानाच रुग्णाचा शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. सिडकोतील साई नगर येथील ५७ वर्षीय करोनाबाधित महिला रुग्णाला शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातून घाटीत दाखल केले होते व उपचारादरम्यान त्याचदिवशी सायंकाळी पावणेसहा वाजता मृत्यू झाला. आंबई (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील ६९ वर्षीय महिला रुग्णाला २९ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा शनिवारी मध्यरात्री सव्वा वाजता मृत्यू झाला. निल्लोड, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला ४ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा शनिवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाला. अडूळ (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील ७५ वर्षीय महिला रुग्णाला ७ ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून घाटीत दाखल केले होते व त्यापूर्वीच रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रविवारी (९ ऑगस्ट) दुपारी दीड वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ४०६, तर जिल्ह्यात ५४४ बाधितांचा मृत्यू झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times