ऑस्ट्रेलिया : मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणासोबत अशी काही घटना घडली ज्याचा आपण कधी विचारही करू शकणार नाही. या तरुणासाठी मित्रांसोबतचा तो क्षण शेवटचा ठरला आहे. तरुण त्याच्या मित्रांसह मासे पकडण्यासाठी गेला होता. पण नदी किनाऱ्याहून अचानक गायब झाला. मित्रांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. पण यानंतर अशी एक घटना घडली ज्याने सगळ्यांनाच घाम फुटला.या बेपत्ता झालेल्या तरुणाची बातमी मिळाली पण ती इतकी भयानक होती की वाचून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर, बेपत्ता झालेला तरुण हा चक्क मगरीच्या पोटाता मृत अवस्थेत आढळला. ही आश्चर्याची घटना आहे, पण खरी आहे. या तरुणाचा मृतदेह मगरीच्या पोटातून बाहेर काढण्यात आला आहे. केविन डार्मेडी असं याचं नाव असून ही घटना ऑस्ट्रेलिया इथं घडली आहे. उत्तर क्वीन्सलँडमधील केनेडी बँड हा खाऱ्या पाण्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. जेथे मोठ्या प्रमाणात मगरी आढळतात.

Pune News : मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी पोलीस बनला, एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून खूप हसाल

मगरीच्या पोटातून मिळाला मृतदेह….

केविन नदीवरून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस २ दिवस त्याचा शोध घेत होती. अखेर पोलीस कर्मचाऱ्यांची नजर एका मोठ्या मगरीवर पडली. त्यांनी तिला बेशुद्ध केलं आणि तिची तपासणी केली असता तिच्या पोटामध्ये माणवी शरीर असल्याचं दिसून आलं. अद्याप मृतदेहाची ओळख पटवण्यात आली नसून हा मृतदेह ६५ वर्षीय केविन यांचाच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मंदिराच्या खोदकामात सापडली हनुमानाची गदा आणि शिवलिंग; PHOTO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

दोन मगरींनी केली हत्या…

मिळालेल्या माहितीनुसार, १३ फूट लांब असणाऱ्या दोन मगरींनी मंगळवारी केविनची हत्या केली. तर एका मगरीने त्याला मारून गिळले. दरम्यान, केविनच्या मित्रांची चौकशी केली असता त्याच्यावर मगरीने हल्ला केल्याचं कोणीही पाहिलं नसल्याची कबुली त्यांनी दिली. पण जर हल्ला झाला तर ओरडण्याचा आवाज आला असता असाही अंदाज पोलिसांचा आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Shocking! अयोध्येत संध्याकाळपासून मंदिर आतून बंद, दरवाजा तोडून आत शिरताच सगळ्यांना फुटला घाम…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here