सुप्रिया सुळे केंद्रात तर महाराष्ट्रात अजित पवार
सुप्रिया सुळे २००६ पासून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. सुप्रिया सुळे २००६ राज्यसभेच्या खासदार बनल्या होत्या. त्यानंतर त्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होत्या. शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील राजकीय निर्णय अजित पवार घेतील, असा तोडगा निघाल्याची माहिती आहे.छगन भुजबळ काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. शरद पवार यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. अजित पवार यांनी राज्याची जबाबदारी सांभाळावी आणि केंद्राची धुरा ही सुप्रिया सुळे यांच्याकडे आली पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
सुप्रिया सुळेंचा मार्ग मोकळा करणे?
शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत दुसरी शक्यता म्हणजे सुप्रिया सुळे यांना नेतृत्वस्थानी बसवणे. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा जर शरद पवारांना सुप्रिया सुळेंच्या हाती सोपवायची असेल तर त्यांना आत्तापासूनच त्यांना सुप्रिया सुळेंकडे नेृतृत्व सोपवण्याची प्रक्रिया करावी लागेल. शरद पवारांच्या जागेवर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष करून ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे सुप्रिया सुळेंना अध्यक्षपदी आणण्यासाठी शरद पवारांनी राजीनामा दिला असावा ही दुसरी शक्यता आहे.
सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द
२००६ ते २००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा खासदार म्हणून काम केलं. २००९ ते २०१४, २०१४ ते २०१९ या दोन टर्म त्या लोकसभेवर खासदार राहिलेल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या असून बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.