नवी दिल्लीः नवीन अध्यक्षाच्या निवडीची ‘योग्य प्रक्रिया’ होत नाही तोपर्यंत या पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी कायम राहतील, असं काँग्रेसकडून रविवारी स्पष्ट करण्यात आलं. सोनिया गांधींचा हंगामी अध्यक्षपदाचा कालवाधी संपत आला आहे. एक वर्षापूर्वी त्यांनी त्यांची या पदावर निवड झाली होती आणि १० ऑगस्टला हा कालावधी संपतोय. पण याचा अर्थ असा नाही के ते पदरिक्त होईल, असं काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनुसिंघवी यांनी सांगितलं. प्रसार माध्यमांशी ऑनलाइन संवादात सिंघवी यांनी हे स्पष्ट केलं.

सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्षपदी कामय राहतील. नवीन अध्यक्षाच्या निवडीची योग्य प्रक्रिया होत नाही तोपर्यंत त्या अध्यक्ष राहतील. नवीन अध्यक्षाची निवड लवकरच केली जाईल, असंह सिंघवी म्हणाले. सोनिया गांधींचा हंगामी अध्यक्षपदाचा कालावधी हा १० ऑगस्टला संपतोय. यामुळे नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित होणार आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं सिंघवी म्हणाले.

पक्षाच्या घटनेमध्ये अध्यक्ष निवडीची प्रक्रिया नमुद आहे. त्यानुसारच पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होताच यासंदर्भात माहिती दिली जाईल, असं सिंघवी यांनी सांगितलं. सोनिया गांधी यांचा हंगामी अध्यक्षपदाचा कालावधी पूर्ण होत असल्याने पक्षात संभ्रमाची स्थिती आहे. त्या या पदावर कायम राहणार आहेत का? असा प्रश्न केला गेला. कुठल्याही पक्षाला अध्यक्ष पद रिक्त ठेवून चालता येणार नाही. सोनिया गांधींचा कालावधी संपत असला तरी पक्षात अध्यक्ष निवडीची एक प्रक्रिया आहे. पक्षाच्या घटनेत लिहिलेल्या या प्रक्रियेनुसा अध्यक्ष निवडला जाईल. काँग्रेस कार्यकारिणीत यात ठरवलं जाईल, असं सिघवी म्हणाले.

सोनिया गांधींचा कालावधी संपल्याने काँग्रेस पक्ष १० ऑगस्टच्या रात्रीपासून नेतृत्वहिन झाला. अध्यक्षपद रिक्त झालं, असं होणार नाही आणि ते शक्यही नाही. असा तर्क लावणं योग्य नाही, असं सिंघवी यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी या गेल्या वर्षी १० ऑगस्टला झाल्या होत्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here