मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा केल्यानंतर तरुणानं दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास आयुष्य संपवलं. तरुणानं गळफास लावून आपला जीवनप्रवास संपवला. त्याच्या अकाली निधनानं सगळ्यांनाच चुटपुट लागली आहे.

 

youth suicide
नागपूर: नागपूर जिल्ह्याील भिवापूर येथील २३ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान लक्षात आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. श्रेणिक बाबाराव लांबडे (२३ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव असून तो शेखापूरमध्ये वास्तव्यास होता.भिवापूर येथील ऑफिसर कॉलनीत राहणाऱ्या काकांकडे (तुकाराम ठाकरे) श्रेणिकचे लहानपणापासूनच शिक्षण झाले. त्यामुळेच शहरात त्याच्या मित्रांची आणि ओळखीची मोठी यादी आहे. दीड वर्षांपूर्वी तो शेखापूर येथे आई-वडिलांकडे राहायला गेला होता. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने श्रेणिक महिनाभरापूर्वी भिवापूरला आपल्या मोठ्या वडिलांना (काकांना) भेटण्यासाठी आला होता. श्रेणिकचे लहानपणापासूनचे शिक्षण मोठ्या वडिलांच्या घरी झाले. रविवारी (३० एप्रिल) त्याचा वाढदिवस होता. रात्री नऊच्या सुमारास त्याची ‘बर्थडे पार्टी’ होती. त्यात सगळे हसत-खेळत होते. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
हॅलो, ५० चहा पाठवा! दररोज पहाटे ४ वाजता कॉल; बीच रिसॉर्टवर पोलिसांची धाड, आत काय चालायचं?
घटनेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत श्रेणिक त्याच्या मित्रांसह जवळच्या मेंढेगाव येथे डेकोरेशनच्या कामात मग्न होता. घरी परतल्यानंतर श्रेणिकने आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. जेवण झाल्यावर रात्री बारा वाजेपर्यंत तो मोबाईल पाहत राहिला. कुटुंब झोपल्यानंतर स्टोअर रूममधील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून श्रेणिकने आपली जीवनयात्रा संपवली. पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. भिवापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शेखापूर येथे मूळगावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्जत लोकलमध्ये प्रवाशाचा मृत्यू, ओळख पटेना; पोलिसांचं लक्ष शर्टच्या लेबलवर गेलं अन् मग…
मृत श्रेणिकचे डेकोरेशन व्यावसायिक निरंजन बिरे यांच्याशी जवळचे संबंध होते. बिरे त्याला डेकोरेशनच्या कामात मदत करायचे. घटनेच्या दिवशीही तो त्यांच्यासोबत डेकोरेशनच्या कामात मग्न होता. सायंकाळी घरी परतल्यानंतर श्रेणिकने स्वतः निरंजन यांना कुटुंबासह केक कापण्यासाठी बोलावले. यावेळी तो खूश होता. तो असे काही करेल असे कोणालाच वाटले नव्हते. सर्व काही आनंदी असताना त्याने अचानक हा टोकाचा निर्णय का घेतला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here