छत्रपती संभाजीनगर : हल्ली गुन्हे कोणत्या कारणामुळे घडतील याचा काही नेम नाही. असाच एक भयंकर प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. इथे एका व्यक्तीने आधी बायकोला सोडलं. त्यानंतर प्रेयसीसोबत राहू लागला. यावर त्याचं मन भरलं नाही म्हणून या नराधमाने आई-वडील नसलेल्या अल्पवयीन मुलीला ‘मी तुझा सांभाळ करतो’ असं आमीष दाखवून प्रमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर त्याने जे केलं ते ऐकून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. अवघ्या महाराष्ट्राला लाजवणारी ही घटना आहे.

अल्पवयीन मुलीला ५ महिन्याचा मुलगा

मिळालेल्या माहितीनुसार, या ४१ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीला ५ महिन्याचा मुलगा देखील झाला आहे. या प्रकरणी मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांनी मुलीची सुटका करून आरोपीला ताब्यात घेतला आहे. सुभाष फकीरा राठोड व ४१ रा. पोखरणी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी असं नराधमाचं नाव आहे.

देवगडवरून आंबे घेऊन जोडपं मुंबईला निघालं, एका चुकीनं पतीने डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा अंत

पहिल्या पत्नीला एक मुलगा, ३ मुली

सुभाषचा काही वर्षांपूर्वी नातेवाईकांच्या साक्षीने विवाह झाला होता. त्याच्या पहिल्या पत्नीला एक मुलगा, ३ मुली अशी अपत्य आहेत. यानंतर त्याने बायकोला सोडून दिले. त्याची पत्नी मुलांसह माहेरी राहते. त्यानंतर त्याने एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् तिच्यासोबत पुंडलिकनगर परिसरात लारू लागला. पुंडलिक नगर भागात राहणारी १६ वर्षाची राणी ती सध्या तिच्या आजीकडे राहते. राणीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. राणी फुल विक्री करण्याचं काम करत होती.

Solapur Crime: सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…

तुझा मी सांभाळ करतो…

फुल विक्री केल्यानंतर तिचे पैसे आजी घेत होती. आजी तिला रागवतही होती. त्यामुळे ती नाराज होती. दरम्यान २०२१ मध्ये परिसरातील एका महिलेला राणी ओळखत होती. त्या महिलेने तिची ओळख सुभाष राठोडच्या पत्नीशी झाली. घरी येणं-जाणं सुरू असताना सुभाष याने अल्पवयीन मुलीला विश्वासात घेतलं. तुझा मी सांभाळ करतो असं आश्वासन दिलं. त्यानंतर राणीला सुभाष याने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

या शारीरिक संबंधातून राणीला एक मुलगा झाला. सध्याचे तो ५ महिन्याचा आहे. या प्रकरणी पीडितेच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून २०२१ मध्ये पुंडलिकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुंडलिक नगर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला. मात्र, आरोपीचा शोध लागला नाही. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे पथकाने बारकाईने तपास करुन सदर गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी व आरोपीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये शोध घेतला. गुन्ह्यातील पीडित मुलगी हीस दिनांक ०१/०५/२०२३ रोजी ताब्यात घेतले. तसेच अल्पवयीन मुलगी व आरोपीस पोलीस ठाणे पुंडलीकनगर येथे हजर करून अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, छत्रपती संभाजीनगर यांनी गुन्हा उघडकीस केला आहे. दरम्यान, याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Pune News : मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी पोलीस बनला, एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून खूप हसाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here