मॅनकाइंड फार्माची कहाणी
मेरठचे रहिवासी असलेले रमेश जुनेजा एक वैद्यकीय प्रतिनिधी होते. १९७४ मध्ये त्यांनी वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. कंपनीची औषधे विकण्यासाठी त्यांना दररोज यूपी (उत्तर प्रदेश) रोडवेजच्या बसने प्रवास करायला लागायचा. ते रोज मेरठ ते पुरकाजी असा रोडवेज बसने प्रवास करायचे. लोकांना त्यांच्या कंपनीच्या औषधांबद्दल माहिती द्यायचे. तर त्या भागातील डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांना अनेक तास थांबावे लागले.
१९७५ मध्ये ते ल्युपिन फार्मा मध्ये रुजू झाले, जिथे त्यांनी ८ वर्षे काम केल्यानंतर १९८३ मध्ये कंपनी पदाचा राजीनामा दिला. जोपर्यंत ते कंपनीसोबत होता तोपर्यंत त्यांनी त्याच्या प्रगतीसाठी खूप मेहनत घेतली. एमआरच्या नोकरीने त्यांना वैद्यकीय क्षेत्र समजून घेण्याची आणि शिकण्याची संधी दिली.
Link �� https://chat.whatsapp.com/CJkafJJU899GShbs1g42OU या लिंकवर क्लिक करून बिझनेस क्षेत्राच्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही आमच्या अधिकृत कम्युनिटीमध्ये सामील होऊ शकता…
जेव्हा गिने घेऊन औषधे घेण्यासाठी आली व्यक्ती
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एकदा जेव्हा ते केमिस्टच्या दुकानात उभे होते आणि त्यांना त्यांच्या कंपनीची औषधे विकत होते, तेव्हा एक माणूस दुकानात आला. त्या माणसाला औषध हवी होती, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. बिल भरण्यासाठी त्याने चांदीचे दागिने सोबत आणले होते. औषधाच्या बदल्यात दागिने देण्याचे त्यांनी सांगितले, जे पाहून रमेश जुनेजा यांचे हृदय द्रवले. त्यांनी त्याचवेळी ठरवले की, अशी औषधे बनवणार, जी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या बजेटमध्ये राहतील. औषध घेण्यासाठी कोणालाही दागिने विकावे लागणार नाही. कमी किमतीच्या आणि उत्तम दर्जाच्या कल्पनेतून त्यांनी स्वतःची फार्मा कंपनी उघडण्याची आयडिया आली.
पहिल्याच प्रयत्नात अपयश
रमेश यांनी मित्रासोबत बेस्टोकेम नावाची फार्मा कंपनी उघडली, मात्र त्यांना यश मिळाले नाही. १९९४ मध्ये त्यांना बेस्टोकॉम सोडावे लागले. यानंतर त्यांनी भावासोबत मॅनकाइंड फार्मा सुरू केली. रमेश यांना सुरुवातीला अपयश आले, पण त्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. त्यांना आपल्या चुका समजल्या. १९९५ मध्ये त्यांनी भावासोबत मॅनकाइंड फार्माची पायाभरणी केली. दोन्ही भावांनी ५० लाख रुपये गुंतवले. कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी २५ वैद्यकीय प्रतिनिधींना त्यांच्यासोबत जोडले. तर कंपनीने पहिल्या वर्षीच आश्चर्यकारक कामगिरी करत कंपनीचे मूल्यांकन ४ कोटी रुपयांवर पोहोचले.
कंडोमबद्दल विचार बदलला
रमेश आणि त्यांच्या भावाची रणनीती यशस्वी ठरली. आज मॅनकाइंड फार्मा कंडोम आणि गर्भनिरोधक उत्पादने बनवण्यात आघाडीवर असून त्यांनी आपल्या व्यवसायाच्या धोरणात सतत नवीन गोष्टींचा समावेश केला. त्यांनी कंडोम आणि गर्भनिरोधक प्रोडक्ट बेडरूममधून थेट वृत्तपत्र, टीव्हीपर्यंत पोहोचवले. त्यांनी जाहिरातींना टार्गेट केले.
मॅनकाइंडने २००७ मध्ये टीव्हीवर कंडोमची अशी जाहिरात दाखवली, ज्यामुळे ती लोकप्रिय झाली. या जाहिरातीचा परिणाम असा झाला की कंडोमचा म्हणजे मॅनकाइंड बनला. २०१२-१३ मध्ये कंपनीने २०% वार्षिक वाढ नोंदवली. कंपनी कंडोम आणि गर्भनिरोधक उत्पादनांव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब औषधे बनवते. आज मॅनकाइंड फार्मा ही कंपनी ४३,२६४ कोटींची झाली आहे.