शिर्डी : शिर्डीमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. इथे भावाने सख्ख्या बहिणीला राहत्या फ्लॅटच्या बेडरुममध्ये मोठ्या पेव्हर ब्लॉकने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. मंगळवारी संध्याकाळी शिर्डीतील कालिकानागर जवळ असलेल्या मयुरेश्वर कॉलनीत उघडकीस आला आहे. सदर घटनेने शिर्डीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वरी नवनाथ कुलथे वय १७ वर्ष असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव असून याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ श्रूत नवनाथ कुल्थे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. मयत मुलीचे आजोबा प्रविन काशिनाथ विसपुते, वय ६५ वर्ष, रा कालीकानगर शिर्डी ता.राहाता यांनी यात फिर्याद दिली की, दिनांक २ मे रोजी सायकाळी ०४/३० ते ०६/ वा. चे सुमारास अज्ञात आरोपीने त्यांची नात (मयत) वय १७ वर्ष रा. सौंदडी बाबा मंदिराजवळ शिर्डी ता.राहाता हिच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून डोक्याचा आणि चेहऱ्याचा चेंदामेंदा करून खून केला.

Solapur Crime: सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…
अज्ञात इसमा विरुध्द ही फिर्याद देण्यात आली होती. सदर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील नागरिकांची चौकशी केला असता पोलिसांना वेगळाच संशय आला. यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावाबद्दल माहिती मिळाली आणि तपासाला वेगळंच वळण लागलं. सदर आरोपीचा शोध घेत असताना येवला ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना पेट्रोलिंग दरम्यान एक संशयीत मोटारसायकल स्वार दिसला.

Pune News : मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी पोलीस बनला, एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून खूप हसाल
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पायाला रक्ताचे डाग होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सहज आपलं खरं नाव सांगितलं. यानंतर पोलिसांनी त्याला रक्ताच्या डागाबद्दल विचारलं. यानंतर आरोपी भावाने असं काही उत्तर दिलं की पोलीस अधिकारी हादरूनच गेले. आपण राहत्या घरीच लहाण बहिणीशी वाद झाल्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला संपवल्याचं त्याने पोलिसांनी सांगितलं.

देवगडवरून आंबे घेऊन जोडपं मुंबईला निघालं, एका चुकीनं पतीने डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा अंत
यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Nashik News: दुर्दैवी! मित्रांसह ब्रह्मगिरी पर्वत चढला, उतरताना ५० किलोच्या दगडाने मोठा आवाज केला अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here