‘उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांनी चुकीचे विधान केले’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी हे चुकीचे विधान केले आहे, असा आरोप सुशांतसिंहचे काका यांनी म्हटले आहे. संजय राऊत अशी चुकीची माहिती देऊन आपची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारे बोलून एखाद्याची प्रतिमा खराब करणे चांगली गोष्ट आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. बिहारमधील प्रत्येकजण हे जाणतो की सुशांतसिंह याच्या वडिलांनी केवळ एकच विवाह केलेला आहे, असेही ते म्हणाले.
सुशांतच्या वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते-सामना वृत्तपत्रातून केला आरोप
खासदार संजय राऊत आपल्या सामनामधील रोखठोक या सदरात लिहितात, ‘सुशांतसिंह राजपूत याचे कुटुंब म्हणजे त्याचे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे चांगले संबंध नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एफआयआर दाखल करायला लावला गेला आणि मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलिस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलिस म्हणजे इंटरपोल नव्हे’
वाचा-
सुशांतची केस आणखी काही काळ मुंबई पोलिसांच्या हातात राहिली असती तर आकाश तुटलं नसतं’
संजय राऊत पुढे म्हणाले की, मुंबई पोलिसांवर आरोप करून बिहार सरकारने केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केली. ही मागणी २४ तासात मान्यही केली गेली. राज्याच्या स्वायत्ततेवर हा थेट हल्ला आहे. जर सुशांतची केस आणखी काही काळ मुंबई पोलिसांच्या हातात राहिली असती तर आकाश तुटले नसते, परंतु हे राजकीय गुंतवणूक आणि दबावाचे राजकारण आहे. सुशांत एपिसोडची ‘स्क्रिप्ट’ आधीच लिहिलेली आहे.’
वाचा-
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times