कॅनबेरा: व्यक्तीच्या आयुष्यात त्याचं स्वत:चं घर हे फार महत्त्वाचं असतं. आपलं घर असावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि खूप मेहनत करुन तो हे स्वप्न पूर्ण करतो. पण, जेव्हा कुणाला त्याच्याच घरातून बाहेर काढलं तर त्या व्यक्तीचं काय होईल. असंच काहीसं ऑस्ट्रेलियातील एका जोडप्यासोबत घडलं आहे. त्यांनी जे घर विकत घेतलं त्याच घरातून त्यांना हाकलून लावण्यात आलं. हे घर त्यांनी लिलावात विकत घेतलं होतं.डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, जेस आणि जॅकी मोरक्रॉफ्टने ५ वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टवर त्यांचे स्वप्नातील घर विकत घेतले होते. हे घर त्यांनी लिलावात विकत घेतले होते. ज्यासाठी त्यांना तब्बल ६ कोटी रुपये मोजावे लागले होते. क्वीन्सलँडच्या मरमेड बीचवर असलेल्या या घरात हे जोडपे गेल्या ५ वर्षांपासून त्याला आपलं घर समजून राहत होते. पण हा त्यांचा भ्रम होता. जेव्हा त्यांना या घराचं सत्य समजं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

४१ दिवसांनी ‘त्या’ दोघांचा पत्ता लागला, पण फक्त शिर शिल्लक, Love Story चा थरकाप उडवणारा अंत
गेल्या ५ वर्षांत त्या घराची किंमत १४ कोटी रुपये झाली होती. मग अचानक त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. हे घर त्यांचं नाही असा निकाल क्वीन्सलँडच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. या घराचे मालक हे जोडपं नाही. आश्चर्यकारक बाब म्हणजे या घराचे मालक हे जुने मालकच आहेत ज्यांच्या घराचा लिलाव झाला होता. या जोडप्यासोबत फसवणूक झाली होती. हे घर जेव्हा या जोडप्याने विकत घेतलं तेव्हा त्यांनी घराची पूर्ण किंमत दिली पण कागदोपत्री हे घर त्यांच्या नावावर करण्यात आले नाही. कागदावर जुन्याच मालकाचं नाव आहे. त्यामुळे हे घर अजूनही जुन्या मालकाच्या नावावरच आहे.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

घराचे मालक ८३ वर्षीय हिंद इसा असल्याचे न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे. या महिलेने रजिस्ट्रार ऑफ टायटल्सकडे जाऊन सांगितले की तिचे घर गुंडांनी जबरदस्तीने गहाण ठेवले आहे. खोटी स्वाक्षरी करून तिची मालमत्ता विकल्याचा दावाही तिने केला आहे. तेव्हापासून जेस आणि त्याची पत्नी घर हे ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर लढाई लढत होते. त्यानंतर न्यायालयाने क्वीन्सलँड सरकारला निर्देश दिले की या जोडप्याला नुकसान भरपाई म्हणून २.७ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच २२ कोटी रुपये देण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here