मॉस्को: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा आरोप रशियन सरकारनं युक्रेनवर केला आहे. पुतीन यांच्या हत्येसाठी क्रेमलिनवर ड्रोन हल्ला करण्यात आल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात पुतीन यांना काहीही झालेलं नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.पुतीन यांच्या हत्येसाठी काल रात्री दोन ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यात आल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचं रशियानं म्हटलं आहे. युक्रेनचे दोन्ही ड्रोन पाडण्यात आल्याची माहिती रशियानं दिली आहे. ‘९ मे रोजी विजयी दिनाचं संचलन होईल. त्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र पुतीन पूर्णपणे सुरक्षित आहेत. आम्हाला प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा अधिकार आहे. ड्रोन हल्ल्यानंतरही ९ मे रोजी विजयी दिनाचं संचलन होईल,’ असं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तानात होतेय पालींची सर्रास कत्तल; रस्त्याशेजारी विकलं जातंय चरबीचं तेल; कारण काय?
आतापर्यंत कोणत्याही देशानं दोन्ही देशांच्या अध्यक्षीय निवासांना किंवा त्यांच्या कार्यालयांना लक्ष्य केलेलं नव्हतं. मात्र आता रशियन अध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनवी आहे. या परिस्थितीत रशिया-युक्रेन युद्ध लवकरच निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मॉस्कोपासून युक्रेनची सीमा जवळपास ६०० किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर कापण्यासाठी कोणत्याही ड्रोनला काही मिनिटांचा कालावधी लागतो. याआधीही युक्रेनचे अनेक ड्रोन मॉस्कोच्या जवळ पोहोचले आहेत. एप्रिलच्या अखेरीस युक्रेनचा UJ-२२ ड्रोन नोंगिस्कच्या जंगलात दिसला होता. हे जंगल मॉस्कोच्या सीमेपासून अगदी जवळ आहे. या ड्रोनमध्ये कॅनडानं पाठवलेलं स्फोटक सापडलं. ड्रोनमध्ये १७ किलो M११२ स्फोटक होतं. त्यामुळे मॉस्कोच्या आतमध्ये ड्रोन पोहोचणं फारसं अवघड नाही. पण पुतीन यांचं निवासस्थान असलेल्या क्रेमलिनपर्यंत ड्रोन पोहोचणं रशियाच्या दृष्टीकोनातून चिंतेचा विषय आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी क्रेमलिनचं किती नुकसान झालं आहे, याबद्दलची नेमकी माहिती समजू शकलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here