मोहाली : पीयुष चावलाला जेव्हा संघात घेण्यात आले तेव्हा बऱ्याच जणांनी नाकं मुरडली होती. पण पीयुष हा मुंबईचा एक असा गोलंदाज आहे जो सातत्याने संघाला विकेट्स मिळवून देत आहे. या सामन्यातही मुंबईच्या संघाला एक मोठा धक्का बसणार होता. पण पीयुष चावलाने अनुभव पणाला लावला आणि त्यामुळे मुंबईचा एक मोठा धोका टळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रोहित यावेळी पीयुषच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले.पंजाबचा कर्णधार शिखर धवन हा या सामन्यात दमदार फलंदाजी करत होता. त्यामुळे त्याला लवकर कसे बाद करता येईल, याची रणनिती रोहित शर्मा आखत होता. यावेळी मुंबईचा फिरकीपटू कुमार कार्तिकेयने धवनला आपल्या जाळ्यात ओढले होते. कारण सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धवन एक मोठा फटका मारायला गेला होता. पण त्यावेळी धवनचे टायमिंग चुकले आणि त्यामुळे त्याचा झेल उडाला होता. हा झेल टिपण्यााठी जोफ्रा आर्चर उभा होता. त्याच्यासाठी हा सोपा झेल होता. पण जोफ्राला यावेळी चेंडूचा अंदाज घेतला आला नाही. त्यामुळे हा चेंडू त्याच्या हातावर बसला आणि उडाला. त्यामुळे धवनला यावेळी जीवदान मिळाले होते. धवनला यावेळी दोन धावाही मिळाल्या.धवन हा आता जास्त आक्रमक होणार हे रोहित शर्माला माहिती होते. त्यामुळे रोहित शर्माने यावेळी आपला हुकमी एक्का असलेल्या पीयुषच्या हाती चेंडू दिला. पीयुषने यावेळी आपला अनुभव पणाला लावला आणि रोहितचा विश्वास सार्थ ठरवला. पीयुषने यावेळी गुगली टाकली आणि त्यावर धवन फसल्याचे पाहायला मिळाले. धवन या चेंडूवर फटका मारण्यासाठी पुढे आला आणि तो फसला. त्यामुळे चेंडू त्याच्याकडून निसटला आणि थेट यष्टीरक्षक इशान किशनकडे गेला. इशानने यावेळी कोणतीही चूक केली नाही. त्यामुळे शिखर धवनला यष्टीचीत व्हावे लागले. त्यावेळी रोहित शर्मानाही मैदानात जल्लोष केला. कारण त्याला धवनच्या विकेटचे महत्व माहिती होते. पीयुष चावला हा मुंबईच्या संघासाठी सध्या संकटमोचक ठरताना दिसत आहे.
Home Maharashtra मुंबई इंडियन्सचा धोका पीयुषच्या एका चेंडूमुळे टळला, रोहित शर्माने केले भन्नाट सेलिब्रेशन