मुंबई : शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. ‘राजकारणातील पक्ष संघटनेचा दबदबा कायम ठेवण्यासाठी भाकरी फिरवावी लागते. भाकरी फिरवली नाही तर ती करपते,’ असे वक्तव्य अलीकडेच शरद पवार यांनी चेंबूरच्या सभेत बोलताना केले होते. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनासाठी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व नेत्यांना मुंबईत आमंत्रित करण्यात आले होते. या साऱ्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनाही शरद पवारांच्या या घोषणेने प्रचंड धक्का बसल्याचे त्यांच्या चेहऱ्यांवरून व प्रतिक्रियांवरून स्पष्ट झाले. कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर पवारांनी राजीनामा दिला खरा पण राष्ट्रवादीच्या घटनेत अध्यक्षपदासंदर्भात नेमकं काय लिहिलंय? विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल? याचाच घेतलेला हा EXCLUSIVE आढावा….विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल?

राष्ट्रवादीच्या घटनेत केलेल्या शिफारशीनुसार अध्यक्षांनी कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला तर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणुक समिती पुढील निर्णय घेते. राष्ट्रीय कार्यकारणी आणि केंद्रीय निवडणूक समिती निवडणूक घ्यायची की नाही याबाबत चर्चा करेल. या दोन्ही समितीला राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता परस्पर चर्चा करून निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

दोन्ही समितीमध्ये अध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा झाली तर राष्ट्रीय कार्यकारणीची तत्काळ बैठक बोलवली जाईल. राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्य विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता एकमुखी निर्णय घेऊ शकतात. कमिटीला तसा अधिकार देण्यात आला आहे.

Praful Patel: सुप्रिया सुळे आणि तुमच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा; एका एका शब्दात प्रफुल्ल पटेलांकडून निकाल!
कमिटी शिफारस करेल त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. राष्ट्रीय अधिवेशन होईपर्यंत कमिटी प्रभारी अध्यक्ष देखील नेमू शकते. राष्ट्रीय अधिवेशन पार पडल्यानंतर अध्यक्षपदाची घोषणा अधिवेशनात केली जाईल.

राष्ट्रीय कार्यकारणी समितीला विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास केवळ पक्ष हितासाठी प्रभारी अध्यक्ष न नेमता थेट अध्यक्ष नेमण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. सध्या शरद पवार पवार यांनी नव्याने अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर केवळ ८ महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येकी ३ वर्षांनंतर नव्या अध्यक्षाची निवड होत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here