आशियाई बाजारात आजच्या व्यापारी सत्रात घसरणीसह सुरुवात झाली. निक्केई २२५ चे शेअर्स ०.३९ टक्के घसरले तर हँगसेंगचे शेअर्स १.६० टक्क्यांनी घसरले. तर नॅसडॅकने १ टक्क्याची वृद्धी घेतली व एफटीएसई एमआयबीमध्ये ०.४३ टक्के घसरण झाली.
तिमाही निकालांचा प्रभाव आज बाजारावर राहील. या आकडेवारीने निर्देशांक पुढील दिशा ठरवतील, असे मत जिओजित फायनान्शिअलचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. निफ्टीसाठी ११२५० ची पातळी महत्वाची ठरेल. पुढे तो ११३५० ते ११४०० च्या दरम्यान राहील, असा अंदाज एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी यांनी व्यक्त केला.
वाचा :
बड्या कोर्पोरेट्सची तिमाही आकडेवारी
अदानी ट्रान्समिशन लिमिटेड: अदानी ट्रान्समिश लिमिटेडने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६६.५ टक्क्यांची वृद्धी नोंदवली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ९.२६ टक्क्यांची वृद्धी झाली. परिणामी तिचे मू्ल्य २५२.५० रुपये झाले. तर कंपनीच्या महसुलात १४.४ टक्क्यांची घसरण झाली.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड: एमअँडएम लिमिटेडच्या स्टॉक्समध्ये १.१६ टक्क्यांची घसरण झाली. त्यांनी ६०२.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ९७ टक्क्यांची घसरण झाली.
अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४२३.१ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा महसूल २००३.५ कोटी रुपये झाला. घसरणीनंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये ४.६४ टक्क्यांची वृद्धी झाली आणि त्यांनी ३,००० रुपयांवर व्यापार केला.
टाटा कंझ्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेड: कंपनीच्या शेअर्समध्ये ६.६५ टक्क्यांची वृद्धी झाली व कंपनीने ५१७.०० रुपयांवर व्यापार केला. तत्पूर्वी कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मजबूत उत्पन्नाची नोंद केली. कंपनीचा नेट प्रॉफिट ८२ टक्क्यांनी वाढला आणि कामकाजातील महसुलात १३.४४ टक्क्यांची वृद्धी झाली.
व्होडाफोन आयडिया लिमिटेड: व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या स्टॉकमध्ये ६.६७ टक्क्यांची वृद्धी झाली व त्यांनी ८.८० रुपयांवर व्यापार केला. २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नेट लॉस २५,४६० कोटी रुपये झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times