नांदेड: पुलावर बसलेल्या एका वानराने वेगाने जात असलेल्या दुचाकीवर उडी घेतली. या घटनेत दुचाकी स्वाराच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेला एक जण हेल्मेटमुळे बालंबाल बचावला. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात सोमवारी ही घटना घडली. अभिषेक तमू असं मृत तरुणाचं नाव आहे.नेमकं काय घडलं?

२६ वर्षीय मृत अभिषेक होमबहादूर तमू हा मूळ अजमेर किशनगढ येथील रहिवासी आहे. मागील अनेक वर्षांपासून तो आपल्या कुटुंबीयांसह धर्माबाद शहरात राहत होता. सोमवारी दुपारी मृत आणि त्याचा मित्र कृष्णा बाबुशा शेळके (वय ३०, रा.शांतीनगर धर्माबाद) हे दोघे दुचाकीने धर्माबादहुन नांदेडकडे कामा निमित्त जात होते. अभिषेक तमू हा वेगाने गाडी चालवत होता. राहेर गावाजवळील पुलावर येताच पुलावर बसलेल्या वानराने त्यांच्या दुचाकीवर अचानक उडी मारली. या घटनेनंतर दोघेही खाली पडले.

५ वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, तुकडे करुन गरम पाण्यात टाकलं, अन्.. आईचं भयंकर कृत्य
डोक्याला मार लागल्याने मृत्यू

भरधाव वेगात असलेली दुचाकी अचाकन पलटल्याने हे दोघेही फरपटत गेले. त्यात डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ झालेल्या अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा शेळके याने तरुण हेल्मेट घातल्याने तो बचावला. मात्र, त्याला छातीला आणि पायाला जबर मार लागला आहे. जखमी झालेल्या कृष्णाला तात्काळ निझामाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी सायलू मकलवाड यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आडे करीत आहेत.

१५ वर्षानंतर शिक्षकाला पहिला पगार मिळाला, घरी पोहोचतानाच काळाने गाठलं, मुलासह प्रवास थांबला

आई-वडिलांनी एकुलता एक आधार गमावला

अभिषेक तमू हा कुटुंबायात एकुलता एक मुलगा होता. घरची जवाबदारी त्याच्यावर होती. काही तरी करुन दाखवण्याचं त्याचं स्वप्न होतं. एका वर्षापूर्वी त्याने धर्माबाद शहरात फरशीचे दुकान देखील सुरु केले होते. मात्र, नियतीने घात केला आणि एका वेळगळ्याच अपघातात त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूने आई वडिलांवर दुःखाच डोंगर कोसळला आहे. या घटनेने पारिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here