डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील रामनगर पोलीस स्टेशन जवळ एका पाळीव पशू-पक्षांसाठी लागणाऱ्या खाद्य व इतर सामान विक्रीच्या दुकानात ग्राहक म्हणून घुसलेल्या एका चोरट्याने दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून मोबाइल उचलून पसार झाला. हा सारा प्रकार तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या संदर्भात दुकानाच्या मालकीण सविता राजाराम गायकवाड यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.सविता यांच्या मालकीचे रामनगर मधील जयसुंदरम बिल्डींगच्या तळमजल्यावर पेट वेलनेस नावाचे दुकान आहे. हे दुकान सकाळी १०.३० ते रात्री ९.३० दरम्यान चालू असते. रविवारी, ३० एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती दुकानात आली. ती व्यक्ती दुकानातील ही पिशवी दाखवा, दुसरी पिशवी दाखवा असे बोलली आणि बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान पिशव्या बघून पसंत नाही, असे सांगून थोड्या वेळाने ती व्यक्ती दुकानातून निघून गेली.

किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक, मुंबईच्या डबेवाल्यांना आमंत्रण, लघुपटाद्वारे बनले होते नाते
थोडयावेळाने सविता या रॅकवर ठेवलेला मोबाइल घेण्यासाठी गेल्या असता, मोबाइल तिथे नव्हता. सविता यांनी दुकानातील सर्व रॅक आणि ड्रॉव्हर तपासले. मात्र मोबाइल कुठेही आढळून आला नाही. संशय आल्याने त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा मात्र फुटेजमध्ये ग्राहक म्हणून दुकानात आलेला चोरटा रॅकवर ठेवलेला मोबाईल त्याने चोरला असल्याचे दिसले.

पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ; गाय तस्करांनीच केले पोलीस हवालदाराचे अपहरण, नाकाबंदी करून अटक
पोलिसांना सांगितले चोरट्यांचे वर्णन

दुकानाच्या मालकीण सविता यांनी चोरट्याचे वर्णन पोलिसांना सांगितले आहे. हिंदी भाषिक आलेल्या त्या चोरट्याने हाफ शर्ट परिधान केला आहे. पोलिसांनी दुकानाच्या मालकीण सविता यांनी सांगितलेले वर्णन आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या या चोरट्याच्या छबीवरून फरार चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

मालगाडीची कार, दोन दुचाकींना धडक; मानसिक धक्क्यातून ४८ तासांनंतरही सावरला नाही कार चालक
दरम्यान हे दुकान रामनगर पोलिस स्थानकापासून जवळ आहे. पोलिस स्टेशन जवळच असे चोरीचे प्रकार घडतं असल्याने या चोरला पकण्याचे आवाहंन पोलिसां समोर आहे, त्यामुळे पोलिस या भामट्या चोराला पकडतात का हे पहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here