लंडन: अनेकदा काही खास आणि महागड्या वस्तूंचा लिलाव केला जातो. यामध्ये चित्रे, जुनी नाणी किंवा चलनी नोटांचा समावेश असतो. असाच आणखी एक लिलाव झाला आहे. या लिलावात काही दुर्मिळ दागिने आणि हिऱ्यांचा लिलाव झाला आहे. या लिलावासाठी ठेवण्यात आलेला हिरा जगातील सर्वात जुना हिरा म्हणून ओळखला जातो. हा हिरा तब्बल ८०० वर्ष जुना अजून तो कोहिनूरपेक्षाही अधिक खास आहे. दुर्दैवी म्हणजे कोहिनूरप्रमाणे हा हिरा देखील इंग्रजांनी भारतातून नेला. या हिऱ्याला ब्रोलिटी ऑफ इंडिया (BRIOLETTE OF INDIA) असं नाव देण्यात आलं आहे. १ मे रोजी लंडनमध्ये या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला.अतिशय खास हिरा

ब्रिटिश ऑक्शन हाऊस क्रिस्टीज जिनिव्हा येथे या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार हा हिरा जगातील सर्वात जुना हिरा आहे. याची किंमत ६३ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हा हिरा खूप खास आहे. हा हिरा ९०.३६ कॅरेटचा आहे. या रंगहीन हिरा आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती आहे. हा एक रंगहीन डी-कलर प्रकारचा हिरा आहे.

वडिलांसोबत चहा घेतला, गप्पा मारल्या अन् खोलीत गेला, काही वेळाने बाबांनी जाऊन पाहिलं तर…
हिऱ्याचा इतिहासही रंजक

ब्रोलिटी ऑफ इंडिया हिऱ्याचा मोठा इतिहास आहे. तो कोहिनूर हिऱ्या पेक्षाही जुना हिरा असल्याची माहिती आहे. नॅचरल डायमंड्सच्या मते, या हिऱ्याचा इतिहास १२ व्या शतकातला आहे. ब्रोलिटी डायमंड हा रंगहीन डी-कलर प्रकारचा हिरा आहे.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

दोनदा हरवला आणि सापडला

या हिऱ्याबाबत विशेष गोष्ट म्हणजे तो दोनदा हरवला होता. पण, दोन्हीदा तो पुन्हा सापडला. क्रिस्टीजच्या म्हणण्यानुसार, हा हिरा एका महाराजाने १९४७ मध्ये विकत घेतला होता. नंतर १९६७ मध्ये, हा हिरा हेलमट हॉर्टनकडे आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here