सातारा : चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी अनेकजण जिमचा पर्याय निवडत असतात. नियमितपणे व्यायाम करुन आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र अनेकांना यावेळी वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. सातारा शहरातील जिममध्ये एक घटना घडली आहे. जिममध्ये व्यायामासाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना सातारा शहरात घडली आहे. याप्रकरणी जिम ट्रेनरवर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. रामसिंग असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित जिम ट्रेनरचे नाव आहे. सातारा शहरातील नावाजलेल्या जिममध्ये असा प्रकार घडल्याने शहरातील महिलांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरातील एका नामांकित जिममध्ये रामसिंग हा ट्रेनर आहे. त्या जिममध्ये एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व्यायामासाठी जात होती. २ मे रोजी सकाळी १० वाजता संबंधित पीडित मुलगी जिमला गेली होती. त्यावेळी जिम ट्रेनर रामसिंगने पीडित मुलीला कार्यालयामध्ये बोलावून घेऊन ‘तुझे फॅट्स वाढले आहेत’, असे बोलून चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला, तसेच पीडित मुलीला चेंजिंग रूमपर्यंत ढकलत नेले. त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केले. या प्रकाराची माहिती पीडितेने तिच्या घरातील लोकांना सांगितली.

Sharad Pawar Resignation : पवारांच्या राजीनाम्याच्या गोंधळात अजितदादांबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा मोठा दावा

संबंधित मुलीनं त्यानंतर पालकांसह तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रामसिंगवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक मोटे अधिक तपास करीत आहेत.

जिम ट्रेनर रामसिंगवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी फिल्डिंग लावली. मात्र, तो सध्या साताऱ्यातून पसार झाला आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात प्रयत्न सुरू केले असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई इंडियन्सला मिळाला नवा स्टार; पदार्पणात धारधार कामगिरी, डेथ ओव्हरमध्ये पाहा केलं तरी काय

महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. साताऱ्यात जिमला जाणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सातारा शहरातील नावाजलेल्या जिममध्ये असे प्रकार घडू लागल्याने महिलांचे या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटातील हालचालींना वेग, दिल्लीतील नेता राहुल नार्वेकरांच्या भेटीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here