छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात ब्रदरने सहकारी सिस्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र तिला सोडून दुसरी सोबतच संसार थाटला. प्रियकराने विश्वासघात केल्याच्या तणावातून सिस्टरने राहत्या घरात विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. ही घटना १ मे रोजी जयसिंगपूरा भागात घडली. यामुळे घाटी रुगालयात एकच खळबळ उडाली. घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी ब्रदरवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली. कल्पना विठ्ठलराव जाधव (वय ३० रा. मोहिनी अपार्टमेंट जयसिंगपूरा ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर ज्ञानेश्ववर किसन पवार (वय ३० रा. घाटी रुग्णालय परिसर) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. कल्पना (वय ३०) २०१६ पासून घाटी रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांना तीन बहिणी व एक भाऊ असून वडिल सेवानिवृत्त आहेत. कल्पना यांचे कुटुंब नांदेड येथे राहते. तर कल्पना जयसिंगपुऱ्यात मोहिनी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होत्या. २६ एप्रिल रोजी कल्पना सुट्टी घेऊन नांदेडला गेल्या होत्या. त्यानंतर ३० एप्रिल रोजी त्या शहरात परतल्या. त्या पाठोपाठ त्यांची आई व भाऊ त्यांच्या घरी आले होते. १ मे रोजी तीघांनी रात्री बराच वेळ गप्पा मारल्या. सोबत जेवणही केले. त्यानंतर सर्व जण झोपायला गेले.

वडिलांसोबत चहा घेतला, गप्पा मारल्या अन् खोलीत गेला, काही वेळाने बाबांनी जाऊन पाहिलं तर…
कल्पाना झोपण्याआधी बाथरुमला गेल्या. मात्र, बराच वेळ होऊनही त्या बाहेर आल्या नाही. भावाला संशय आल्याने त्यांनी आईला हा प्रकार सांगितला. दोघेही बराच वेळ कल्पना यांना आवाज देत राहिले. अखेर त्यांनी दरवाजा तोडला. त्यांना कल्पना बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांनी हाताला इंजेक्शन घेतल्याचे आढळून आले. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.

आई नातवाचा निकाल आणायला शाळेत गेली, घरात येऊन पाहते तर धक्काच बसला, एकुलता एक लेक…
स्वत:च स्वत:ला मेसेज पाठवून आधार देत होत्या

कल्पना यांची घाटीतच काम करणारा ब्रदर ज्ञानेश्वर सोबत ओळख होती. तो नेहमी कल्पना यांना भेटत होता. गेल्या काही दिवसांपासून तो लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक, मानसिक छळ करत होता. लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच मुलीसोबत संसार मांडला. २४ मार्चला त्याने रुग्णालयात सर्वांसमोर अपमान केला होता. त्यामुळे कल्पना तणावात गेल्या होत्या. त्यामुळे ज्ञानेश्वरनेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांच्या आईने व्हॉटसऍप मेसेजच्या आधारे पोलिसात तक्रार केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here