मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यादरम्यान वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यावेळी सगळ्यात जास्त पावसाचा तडाखा हा विदर्भाला बसणार आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असेल. यावेळी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात आज गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि योग्य ठिकाणी धान्याची विल्हेवाट लावावी अशा सूचना देण्यात आला आहेत.

Pune News : मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी पोलीस बनला, एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून खूप हसाल

महाराष्ट्रात ३ दिवस ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे २ दिवस तर विदर्भामध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Solapur Crime: सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…

कुठल्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

राज्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगावमध्ये तुफान पाऊस झाला असून पुढचे काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे २४ तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.

का सुरू आहे अवकाळी पाऊस?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रामध्ये मालदीव बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील विदर्भापासून ते तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. म्हणून राज्यात मे महिन्यातही अवकाळीचा तडाखा पाहायला मिळेल.

सख्खा भावाने लहान बहिणीला बेडरुममध्येच संपवलं; सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने डोकं अन् चेहऱ्याचा चेंदामेंदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here