मुंबईः लग्न झाल्यानंतर मुलीची पाठवणी करणे हा वधूच्या कुटुंबीयांसाठी हृद्य सोहळा असतो. यासाठी वधूच्या कुटुंबाकडून विशेष तयारी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि अन्य सजावट करून आकर्षक पद्धतीने सजवलेल्या गाडीतून मुलीची पाठवणी केली जाते. मात्र, मराठवाड्यातील एका कुटुंबाने आपल्या मुलीची पाठवणी शेणाने सारवलेल्या गाडीतून केली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, जाणून घेऊया…

मुलीची पाठवणी शेणाने सावरलेल्या गाडीतून करणाऱ्या वधू पित्याचे नाव आहे, . मुलीची अशा प्रकारे पाठवणी केल्यामुळे पंचक्रोशीतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डॉ. दुधाळ यांनी मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात आपली सेवा बजावली असून, सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.

२०१९ मध्ये मे महिन्यात संपूर्ण देशभरात कडक उन्हाळा होता. उन्हापासून गारवा मिळावा, यासाठी गाडीतील एसी वाढवावा लागत असे. मात्र, तरीही उन्हापासून दिलासा मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून त्यांनी आपली गाडी शेणाने सारवली. निवृत्तीनंतर डॉ. दुधाळ यांनी सामाजिक कार्यकर्ते राजीव दीक्षित यांच्यापासून प्रेरणा घेत येथे गुरुकूल गोशाळा स्थापन केली. यानंतर शेणावर संशोधन करायला त्यांनी सुरुवात केली. शेणामुळे बाहेरील तापमान कमी करण्यास मदत मिळते, असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आपली गाडी शेणाने सारवली.

संपूर्ण गाडी शेणाने सारवण्यासाठी तब्बल ३० किलो शेणाचा वापर करण्यात आला आहे. पूर्ण गाडी शेणाने सारवल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गाडीतील तापमान कमी राहते. यामुळे गाडीतील एसीचा वापरही कमी होतो, असा दावा डॉ. दुधाळ यांनी केला आहे.

गाडी शेणाने सारवल्यामुळे ६ महिन्यांपर्यंत गाडी धुवावी लागत नाही. ज्यामुळे प्रतिदिन २० लीटर म्हणजेच प्रति महिना ६०० लीटर पाण्याची बचत होते, असेही डॉ. दुधाळ यांनी सांगितले. गाडीबरोबरच डॉ. दुधाळ यांनी आपले मोबाइल कव्हरही शेणाने सारवले आहे. शेणाने सारवल्यामुळे मोबाइल रेडिएशनपासून बचाव होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here