प्रसाद शिंदे, अहमदगनर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम म्हटलं तर तरुणाईसाठी एक पर्वणीच असते. गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटीलची सर्वत्र चर्चा आहे. गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला तरुणाईचा जोरदार प्रतिसाद मिळतो. गौतमी पाटीलचे कार्यक्रम आणि प्रेक्षकांची हुल्लडबाजी हे समीकरण देखील ठरलेलं. अतिउत्साही प्रेक्षकांमुळं तिचे कार्यक्रम बंद करायला लागले आहेत. गौतमी पाटीलवर अनेकांनी टीका केल्यानं ती अनेकदा चर्चेत असते. अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलनं सामाजिक कार्यासाठी कार्यक्रम सादर केला. वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशानं आयोजित कार्यक्रमाला तिनं हजेरी लावली होती.

अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी गौतमी पाटील यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौतमी पाटील यांनी सर्व नागरिकांना वसतिगृहाच्या बांधकामासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मी पण शक्य असेल तितकी मदत नक्की करणार असे गौतमी पाटील हिनं सांगितलं. वसतिगृहाच्या बांधकामांसाठी नृत्य करणार असल्याने मला खुप आनंद होत आहे, असंही ती म्हणाली.

श्रीगोंद्यातील कार्यक्रमाचं आयोजन लहुजी समाज सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची आवश्यकता आहे, त्याच्या बांधकामांसाठी मदत मिळावी म्हणून गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शरद पवारांची निवृत्तीची घोषणा, राहुल गांधींसह स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन, राजीनाम्याबाबत म्हणाले…

श्रीगोंदा येथे सामाजिक विभागाचे एकच वसतिगृह असल्याने विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.हे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वसतिगृह बांधायचे असे ठरवले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च असून गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून जी काही मदत मिळेल त्यातून बांधकाम सुरू करणार असल्याचे आयोजक खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन भगवानराव गोरखे यांनी सांगितले आहे.

१० मे ला राष्ट्रवादीचं ठरेल, नंतर नव्या सरकारच्या घडामोडी, भूकंपाचा दावा कुणी केला?

दरम्यान, व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं असता गौतमी पाटील हिनं व्हिडिओ व्हायरल करुन त्यानं गुन्हा केला असून आणखी काही जणं त्यामध्ये होते ते पकडले जातील, असं तिनं सांगितलं. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलेल्या टीकेला देखील गौतमी पाटीलनं प्रत्युत्तर दिलं.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर शरद पवारांची नापसंती, पण उद्धव ठाकरेंची संयमी प्रतिक्रिया, म्हणाले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here