मुंबई : शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. आणि ते त्यांच्या मतावर अजूनही ठाम आहेत. पण महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्यासाठी आग्रह केलेला आहे. यासह वेगवेगळ्या राज्यातील नेते आणि प्रदेशाध्यक्ष हेच सांगत आहेत. सध्यातरी शरद पवारसाहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.कार्यकर्त्यांची भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. सर्वांची मतं आणि भावना पवार साहेबांना सांगितल्या. त्यांची भूमिका काय आहे, हेही सांगितलं. महाराष्ट्रातल्या असंख्या कार्यकर्त्यांना तरुणांना आणि त्यांच्या पिढीत काम करणाऱ्या सर्व ज्येष्ठांच्या भावना या आहेत की आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रहावं, अशी सर्वांची मागणी असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावर उद्या बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचं नावंही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी जयंत पाटील यांचं नाव सुचवलं आहे. यावरही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. त्यांनी माझं नाव घेतलेलं असलं तरी दिल्लीची जबाबदारी बघता मी महाराष्ट्रात काम करतो. महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात माझ्या ओळखीही नाहीत आणि संपर्कही नाहीए. यामुळे दिल्लीत बसणाऱ्या लोकसभेत आणि राज्यसभेत काम करणाऱ्या आणि काही वर्षे संसदेत बसून देश बघणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. पवार साहेबांना तो अनुभव आहे. म्हणून पवारसाहेबांनी देशात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम केलं, असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Sharad Pawar Resignation : पवारांच्या राजीनाम्याच्या गोंधळात अजितदादांबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा मोठा दावा
पवार साहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. अजूनही आम्ही सर्वच सांगतोय. पण पक्ष पुढे नेण्यासाठी काहीतरी पावलं टाकली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. मला आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना आम्हाला सगळ्यात जास्त काळजी आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत पवार साहेब अध्यक्ष राहिले तर पक्षातल्या सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील. आम्ही राज्यस्तरावर कोणावर अन्याय करत असू तर ती व्यक्ती त्यांच्याकडे जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडू शकते. आणि ते योग्य ते न्याय करतात. पण पवार साहेब अजूनही त्यांच्या मतावर ठाम आहेत, असं जयंत पाटील बोलले.
Sharad Pawar : मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडले नाही, पवारांची उद्धव ठाकरेंवर टीका
‘अनेकांचे राजीनामे आले, आमचे नेते निराश झालेत’

माझ्याकडे पक्ष कार्यालयामध्ये अनेकांचे राजीनामे आले आहेत. काही माझ्या मोबाइलवर राजीनामे पाठवले आहेत. पवार साहेब नसतील म्हणून अनेक जण निराश झाले आहेत. पवार साहेब नसतील पक्षात न्याय मिळेल का? अशी भावना देखील अनेकांची झाली आहे. म्हणून लोकं त्या भीती पोटी आपली नाराजी व्यक्त करत आहेत. पण त्यांना आम्हाला समजावून सांगावं लागेल, असं पाटील म्हणाले.

‘हा राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न’

राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांचा भाजपसोबत जाण्यासाठी दबाव होता आणि त्यातूनच पवार साहेबांनी राजीनामा दिला अशी चर्चा आहे. यावरून जयंत पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे. अशा प्रकारच्या चर्चा होतच असतात. पण त्यात काही तथ्य नाही. पण कारणातून एवढा मोठा निर्णय पवार साहेब घेतील असं वाटत नाही. अशा चर्चांना काही अर्थ नाही. मला अशा चर्चांची माहिती नाही. त्यामुळे असा निर्णय पवार साहेब घेतील, असं मला वाटत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधातील प्रचारादरम्यान वक्तव्य केलं. त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला. पण अशी कुठलीही चर्चा नाही. आता निवडणुकांना सव्वा वर्ष राहिलं आहे. यामुळे आम्ही निवडणुकांच्या तयारीसाठी काम करतोय. त्यामुळे अशा प्रकारची चर्चा करणं हे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here