म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर: एकाच ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या मनपातील अनेक अभियंत्यांच्या जंबो बदल्या सोमवारी आयुक्त् यांनी केल्या. या बदल्यांमुळे मनपात एकच खळबळ उडाली आहे. या बदल्यांमध्ये १२ उपअभियंत्यांचा समावेश असून, यातील काहींकडे कार्यकारी अभियंत्यांचा अतिरीक्त प्रभारही होता. तो काढून टाकत दुसऱ्या अभियंत्यांडे देण्यात आला.

बदल्यांचा हा आदेश कार्यमुक्तीचा असून, आदेशाप्रमाणे रूजू न झाल्यास तसेच आदेश रद्द व बदल करण्यासाठी कोणता दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंग समजून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. या बदल्यांमध्ये धरमपेठ झोनचे उपअभियंता पी.एम. आगरकर यांच्याकडून पदभार काढून घेत उपअभियंता अनिल गेडाम यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच गेडाम हे झोन क्र. २ धरमपेठच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरीक्त् कार्यभारही पाहतील.

वाचाः

उपअभियंता रवींद्र बुधाडे यांच्याकडील झोन क्र. ६ चा कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार काढून झोन क्र. ५ चे कार्यकारी अभियंता धनंजय मेंढूलकर यांच्याकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले. उपअभियंता एस.आर.गजभिये याच्याकडील कार्यकारी अभियंता पदाचा पदभार काढून तो झोन क्र.४ चे उपअभियंता यु.व्ही. धनविजय यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. या बदल्यांमध्ये २१ कनिष्ठ अभियंत्यांचीही अंतर्गत विभागनिहाय बदल्या करण्यात आल्या. अनेक वर्ष झोन व एकाच विभागात कार्यरत असलेल्या अनेकांना वेगळया ठिकाणी हलविण्यात आले आहे. यासोबतच ३३ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. मनपात एवढया मोठया प्रमाणात अभियंत्यांच्या प्रथमच बदल्या करण्यात आल्या आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here