नवी दिल्ली : अमेरिकेतील सध्याच्या बँकिंग संकटाने जगभरची चिंता वाढवली आहे. मागील दोन महिन्याच्या कालावधी तीन बँकांना टाळं लागलं आहे. सिलिकॉन व्हॅली बॅंकेनंतर सिग्नेचर आणि अलीकडेच फर्स्ट बँकही बुडाली. दरम्यान, अमेरिकेची आणखी एक प्रादेशिक बँक – पॅसिफिक वेस्ट बँक- कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. अमेरिका सध्या २००८ नंतर सर्वात वाईट बँकिंग संकटाला सामोरे जात असून पॅकवेस्ट बँक आता मदत मागत आहे. या बँकेचे शेअर्स काही तासांतच ५० टक्क्यांनी कोसळले असून कॅलिफोर्निया-स्थित बँक शेअर्समधील जोरदार घसरणीनंतर विक्रीसाठी सर्व धोरणात्मक पर्यायांवर विचार करत आहे.

फर्स्ट रिपब्लिक बँकेनेही तेच सांगितले
‘रणनीती पर्याय शोधत आहोत’ आणि ‘कृपया मदत करा’ हे धोक्याचे संकेत देणारे वॉल स्ट्रीट शब्द आहे. फर्स्ट रिपब्लिक बँकेने देखील धोरणात्मक पर्यायांचा शोध घेत असल्याचे म्हटले होते. फर्स्ट रिपब्लिक बँक सोमवारी बंद झाली असून जेपी मॉर्गनने त्यांची बहुतेक मालमत्ता विकत घेतली. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्यानुसार बँक स्वतःला विकू इच्छित आहे, पण बोली लावणारे समोर येत नाहीत. पॅकवेस्ट बँक कंपनीचे विभाजन करण्याच्या विचारात असून बँक स्वत: च्या उदरनिर्वाहासाठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे.

अमेरिकन बँकिंग क्षेत्राला पुन्हा हादरा! आणखी एका महाकाय बँकेचे शटर डाऊन, आता पुढे काय?
पॅकवेस्ट बँकेने एका निवेदनात म्हटले की, “सामान्य प्रथेप्रमाणे कंपनी आणि तिचे संचालक मंडळ सतत धोरणात्मक पर्यायांचा आढावा घेत आहेत.” बँकेने म्हटले, “अलीकडेच कंपनीने अनेक संभाव्य भागीदार आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधला आणि चर्चा सुरू आहे. कंपनी शेअरधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व पर्यायांचे मूल्यांकन करत आहे.

पॅकवेस्टने एका निवेदनात म्हटले की, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीला फर्स्ट रिपब्लिक बँकेची विक्री सोमवारी जाहीर झाल्यापासून कोणत्याही असामान्य ठेवी बाहेर पडल्याचा अनुभव नाही. लक्षणीय आहे की पॅकवेस्टने गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांना दिलासा देणारी विधाने जारी केली असताना, यूएस बँकिंग संकट सुरू झाल्यानंतर त्याच्या शेअरच्या किंमतीला – इतर यूएस प्रादेशिक बँकांप्रमाणेच – फटका बसला आहे. गेल्या पाच दिवसांत बँकेचे शेअर्स ४२% हून अधिक खाली पडले असताना फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या विक्रीचा त्याच्या शेअरच्या किमतीवर किती वाईट परिणाम झाला हे दर्शवते.

बँकिंग संकटामागचं मुख्य कारण काय? RBI गव्हर्न शक्तिकांत दास यांनी स्पष्टच सांगितले
फेडची दरवाढ महागात पडली
दुसरीकडे, इतर अनेक यूएस प्रादेशिक बँकांप्रमाणे वाढत्या व्याजदरांमुळे पॅकवेस्ट बँकेचे कर्ज आणि बाँड होल्डिंगचे मूल्य लक्षणीय घटले आहे. उल्लेखनीय आहे की जेव्हा यूएसमध्ये मुख्य व्याजदर शून्याच्या जवळ होता, तेव्हा बँकांनी रोखे आणि रोख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. गेल्या वर्षांपासून यूएस फेडने व्याजदरात सातत्याने वाढ केल्यामुळे बाँड्स आणि सिक्युरिटीजचे मूल्य लक्षणीयरीत्या घसरले आहे. त्यामुळे बँकांचे मोठे नुकसान झाले. लक्षात घ्या की अमेरिकेची केंद्रीय बँक -फेडरल रिझर्व्हने बुधवारीही व्याजदरात ०.२५% वाढ जाहीर केली.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here