सातारा : वाढदिवसाचा केक कापण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या तिघांना लुटण्यात आलं. दोन मैत्रिणी आणि त्यांच्या एका मित्राला तिघा जणांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील टेंभू येथे काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात तिघा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे राहणाऱ्या एका युवतीचा मंगळवारी वाढदिवस होता. सचिन कोळी हा त्या युवतीचा मित्र असून त्याने त्या युवतीच्या मैत्रिणीला मेसेज करून आपण वाढदिवसाचा केक कापूया, असे सांगितले. त्यानुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन कोळी हा त्याची कार घेऊन विद्यानगर येथे गेला.

Thane News : धडाम्! देशकर कुटुंबाच्या गॅलरीत मोठ्ठा आवाज, पाहिलं तर पाचव्या मजल्यावरुन…
वाढदिवस असलेली युवती आणि तिची मैत्रीण गाडगे महाराज महाविद्यालयासमोर सचिन कोळी याच्या कारमध्ये बसल्या. त्यानंतर सचिनने कार कृष्णा कॅनॉलवरून ओगलेवाडी रस्त्याने टेंभू गावच्या हद्दीतील परिसराकडे नेली. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निर्जन ठिकाणी कार थांबल्यानंतर संबंधित दोन्ही युवती आणि सचिन कोळी हा कारमधून उतरून बोलत थांबले होते.

दरोडेखोरांचा हैदोस; घरात घुसून दागिन्यांची लूट, घटनेचा सीसीटीव्ही समोर

त्यावेळी अचानक तिघे जण त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात कोयते होते. एवढ्या रात्री तुम्ही इथे कशाला आलाय, असे म्हणून त्या तिघांनी सचिन कोळी याच्यासह दोन्ही युवतींना धाक दाखवला. एका युवतीच्या कानातील कर्णफुले काढून घेतली. तसेच तिघांचेही मोबाईल त्यांनी काढून घेतले. तिघांना कारमध्ये घालून लुटमार करणाऱ्यांनी कार डोंगराच्या दिशेने पुढे नेली.

Sangli News: गटांगळ्या खाणाऱ्या पुतणीला काकाने वाचवलं, पण पाय घसरला न् दोघं पुन्हा बुडाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here