कल्याण: एका चोराने चक्क महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र खेचण्याचे धाडस दाखवले आहे. हा सर्व प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने त्या चोरट्याचा शोध सुरू केला.लोकल ट्रेनमधून महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र खेचून पसार झालेल्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या चार तासात बेड्या ठोकल्या आहेत. प्रवीण पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याने आणखी काही चोऱ्या केल्यात का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेनंतर महिला पोलिस जर सुरक्षित नसतील तर इतर प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञांना भारतात ‘खजिना’ गवसला, २००० वर्षांपूर्वीची मॉडर्न सोसायटी सापडली
कल्याण येथे राहणाऱ्या पूजा आंधळे या पोलिस कॉन्स्टेबल असून त्या मुबंई येथे कार्यरत आहेत. ३ मे रोजी पुजा आंधळे या मुंबईला जाण्यासाठी लोकल पकडण्यासाठी कल्याण स्थानकावर आल्या. यावेळी पूजा या युनिफॉर्मवर नसून सिव्हील ड्रेसवर होत्या. लोकल आल्‍यानंतर त्यांनी लोकलमध्ये जात असताना एका चोरट्याने त्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी तपास चालू केला.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने त्या चोरट्याचा शोध सुरू केला. अवघ्या चार तासात या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रवीण पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याला दारूचे व्यसन आहे. दरम्यान, कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत चोरटे संधी साधत प्रवाशांचा ऐवज लंपास करतात. या घटनांवर आळा घालण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

घरात बहिणीच्या लग्नाची लगबग, आदल्या दिवशी भावाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाने आधार गमावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here