कोलकाता: पश्चिम बंगालच्या नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातील मजुमदार कुटुंबाचा सदस्य असलेल्या ‘भक्तो’ पोपटानं गेल्याच आठवड्यात अखेरचा श्वास घेतला. तब्बल २५ वर्षे भक्तो मजुमदार कुटुंबासोबत होता. आजारपणामुळे भक्तोचा मृत्यू झाला. तब्बल अडीच वर्षांची साथ सुटली आणि मजुमदार कुटुंब भावुक झालं. कुटुंबातील प्रत्येक सदस्य रडला.मजुमदार कुटुंबानं भक्तो विधीवत अखेरचा निरोप दिला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनानंतर श्राद्धाचं जेवण ठेवण्यात येणार आहे. मजुमदार कुटुंब नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातील आयरा गावात वास्तव्यास आहे. २८ एप्रिलला भक्तोनं जगाचा निरोप घेतला. त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानं अखेरचा श्वास घेतला.
ऑडीचा भीषण अपघात, ३० सेकंदात ४ जणांचा मृत्यू; ३ जिवलग मैत्रिणींचा अंत, बॉडी सीटला चिकटल्या
‘आमचं कुटुंब तीन वेळा जे काही जेवायचं, तेच खाद्य आम्ही आमच्या भक्तोला द्यायचो. तो आम्हाला बाबा, दादा अशी हाक मारायचा. माँ शब्दही अगदी व्यवस्थित उच्चारायचा. त्याच्यासोबत आमचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं. तो आमच्य्या कुटुंबातला सदस्य होता,’ असं कुटुंबप्रमुख तारक मजुमदार यांनी सांगितलं.

‘२८ एप्रिलला आमच्या घरात एक कार्यक्रम सुरू होता. आम्ही गाणी गात होतो. त्यावेळी भक्तो पिंजऱ्यात होता. त्यावेळी त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. गाण्याच्या मोठ्या आवाजामुळे कदाचित हे घडलं असावं. आम्ही त्याला त्वरित पिंजऱ्यातून बाहेर काढलं. काही वेळासाठी त्यानं डोळे उघडले. मात्र त्यानंतर त्यानं डोळे मिटले ते कायमचे,’ अशा शब्दांत मजुमदार यांनी घटनाक्रम सांगितला.
अजब लग्नाची गजब गोष्ट; मोठ्या बहिणीच्या गळ्यात माळ घातली, लहान बहिणीसोबत सप्तपदी
भक्तोच्या मृत्यूबद्दल समजताच मजुमदार यांचे शेजारी धावून आले. भक्तो मनुष्यरुपात जन्म घेईल, अशी आशा तारक मजुमदार यांनी व्यक्त केली. मजुमदार कुटुंबानं २ मे रोजी हुगळी नदीच्या काठावर संपूर्ण रितीरिवाजांनुसार भक्तोचे अंत्यसंस्कार केले. ३ मे रोजी श्राद्ध भोजनाचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी २५ जणांना बोलावण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here