शिर्डी : सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या नगरीत दररोज देशभरातील हजारो भक्त दर्शनासाठी हजेरी लावत असतात. मात्र भक्त शिर्डीत आल्यानंतर पॉलिश एजंट त्यांना गराडा घालून व्हीआयपी दर्शनाचं आमिष दाखवून आर्थिक लूट करतात. याचाच अनुभव चक्क साई संस्थानचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सिवा शंकर यांना आला असून एका एजंटने थेट सिवा शंकर यांनाच व्हीआयपी दर्शनाची ऑफर दिली. शंकर यांनी ती ऑफर धुडकावून साई संस्थानमध्ये कोणालाही सूचना न देता सामान्य भक्ताप्रमाणे रांगेतून दर्शन घेतले. खुद्द शंकर यांनीच माध्यमांशी बोलताना हा अनुभव सांगितला.गेल्या अनेक दिवसांपासून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद प्रभारी अधिकाऱ्याकडे होते. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार सिवा शंकर यांची साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून सिवा शंकर यांनी आज गुरुवारी साई संस्थानचा पदभार स्वीकारला. त्यांनंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत अधिकाधिक माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवारांचा मोठा निर्णय, प्रफुल्ल पटेलांचा फोन गेला, तातडीनं मुंबईत या, बड्या नेत्याला बोलावणं धाडलं
यावेळी पत्रकारांशी बोलताना कार्यकारी अधिकारी सिवा शंकर म्हणाले की, मी आज सामान्य भक्तांना दर्शन घेताना काय अडचणी येतात हे पाहण्यासाठी सामान्य दर्शन रांगेतून साई दर्शनाला गेलो. मात्र ३ तास दर्शन रांगेत थांबताना अनेक अनुभव आले असून भक्तांना काय अडचणी येतात हे समजले. त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दलालांचा बंदोबस्त कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Sharad Pawar : तुम्हाला पुन्हा असं आंदोलनाला बसावं लागणार नाही, शरद पवार यांचे माघारीचे संकेत!
एजंट नेमकं काय करतात, त्यांची मोडस ऑपरेंडी कशी?

साईभक्त जसेही शिर्डीत दाखल होतात, मंदिर परिसरात येतात तेव्हा एजंट भक्तांना आवाज देऊन थांबवतात. त्यांना हॉटेल, व्हीआयपी साईदर्शनाच्या विविध ऑफर देतात. श्रीमंत-गरीब साईभक्त बघून त्याच्याकडून हजारो रुपये दर्शनाच्या नावाखाली उकळले जातात. अशी त्यांची मोडस ऑपरेंडी असतात. अशा एजंटचा साईबाबांच्या शिर्डी नगरीत सुळसुळाट झालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here