मुंबई: वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच कुठल्या ताऱ्याने आपल्या ग्रहाला गिळंकृत केल्याचं पाहिलं. या ताऱ्याने गुरु ग्रहा इतक्या मोठ्या ग्रहाला गिळंकृत केलं आहे. कदाचित पृथ्वीच्या बाबतीतही पुढे जाऊन असंच घडेल. सूर्य पृथ्वीला गिळंकृत करेल. जेव्हा या वृद्ध ताऱ्याने गुरु ग्रहाच्या आकाराचा ग्रह गिळला तेव्हा शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या भविष्याची झलक पाहिली.संशोधकांनी सांगितले की, हा तारा रेड जायंट बनण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. हा टप्पा कोणत्याही ताऱ्याच्या वयाचा शेवटचा टप्पा असतो. या दरम्यान त्या ताऱ्याचा हायड्रोजन संपतो आणि त्याचा विस्तार होऊ लागतो. तारा जसजसा वाढत गेला तसतशी त्याची त्रिज्याही वाढली, यामध्ये एक ग्रह त्याच्या त्रिज्येत आला आणि त्याचा बळी गेला.

एकेकाळी हा तारा आपल्या सूर्याच्या आकाराचा असायचा आणि त्याचा प्रकाशही सूर्यासारखाच होता. हा तारा आपल्या आकाशगंगेत पृथ्वीपासून सुमारे १२ हजार प्रकाशवर्षे दूर आहे. हा तारा दहा अब्ज वर्षांचा आहे, म्हणजेच सूर्याच्या वयाच्या दुप्पट आहे.

तोंडात कपडा घातला, केमिकलने जाळलं, गळा आवळला; पोटच्या पोरीसोबत बापाचं भयंकर कृत्य, कारण काय?
रेड जायंट बनल्यानंतर, तारे त्यांच्या वास्तविक व्यासाच्या शंभरपट जास्त पसरू शकतात आणि या काळात ते आजूबाजूच्या सर्व ग्रहांना गिळंकृत करतो. शास्त्रज्ञांनी याआधी रेड जायंटला इतर तारे गिळताना पाहिले होते, परंतु अशाप्रकारे ग्रह गिळताना त्यांनी प्रथमच पाहिले आहे.

एमआयटी कावली इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सचे संशोधक डॉ. किशाले डे यांनी सांगितलं की, आजपासून सुमारे पाच अब्ज वर्षांनंतर सूर्यही रेड जायंट बनेल, त्यानंतर तो बुध, शुक्र आणि शेवटी पृथ्वीला गिळंकृत करेल. डे यांनी या घटनेवर एक शोधनिबंध लिहिला आहे जो नेचर मासिकाने प्रकाशित केला आहे.

ज्या ग्रहाला गिळंकृत करण्यात आले तो ‘हॉट ज्युपिटर’ वर्गातील ग्रह असल्याचं या शोधनिबंधाता सांगण्यात आलं आहे. तो आपल्या सूर्यमालेतील गुरु या ग्रहासारखाच होता, परंतु तो त्याच्या ताऱ्याच्या खूप जवळ होता. कदाचित त्याचा आकार गुरूपेक्षा काही पटींनी मोठा होता. तो एका दिवसात आपल्या ताऱ्याची कक्षा पूर्ण करत होता. जसजसा या ताऱ्याचा विस्तार होत गेला तसतसा हा ग्रह त्याच्या जवळ जात गेला.

ना आजार, ना आघात; महाकाय हॅमरहेड शार्क मृतावस्थेत, पोटात ४० पिल्लं; पाहून डोळे पाणावतील
हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्सचे डॉ. मॉर्गन मॅक्लिओड यांनी सांगितलं की, “ज्या प्रकारे उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात पडतात त्याच प्रकारे हा ग्रह त्याच्या ताऱ्याच्या आत तुकड्यांमध्ये पडला. तो जितका खोल गेला, त्याचा आत पडण्याचा वेग तितकात वाढत गेला. अचानक सूर्याने हा तारा वेगाने गिळला, त्यानंतर आम्हाला उर्जेची एक लहर दिसली. संशोधकांनी त्या ताऱ्याचे इतर ग्रह पाहिलेले नाहीत. पण, त्याचे इतर ग्रहही अस्तित्वात असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे.

डॉ. मॅक्लिओड म्हणतात की, आपल्या ग्रहासोबतही एक दिवस हे होईल याचा विचार करणंही कठीण आहे. आपण तर आपल्या सूर्यापुढे इतके लहान आहोत की पृथ्वीला गिळंकृत केल्यानंतर सूर्याला काहीही फरक पडणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here