नाशिक : नाशिक जिल्ह्यासह शहराला लाचखोरीचे ग्रहण लागले असून लाच देण्या-घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. वर्षभरापूर्वीच पदोन्नती मिळालेल्या नाशिकमधील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सात हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात संशयिताविरुद्ध सामान्य दोषारोपपत्र दाखल करण्याच्या मोबदल्यात त्याच्या भावाकडून ७ हजार रुपयांची लाच घेताना सागर गंगाराम डगळे (वय ३८ वर्ष, पद सहाय्यक पोलीस निरीक्षक (वर्ग- 2) नेमणूक उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.सन २०२२ मध्ये या अधिकाऱ्याला एपीआयपदी पदोन्नती मिळाली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विशेष सुरक्षा विभागाच्या निवड यादीत त्याचा समावेश होता. उपनगर येथे २४ वर्षीय तरुणाविरोधात नात्यातीलच १६ वर्षीय मुलीचे प्रेमसंबंधातून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार उपनगर पोलिसांनी जळगाव येथून संशयिताला अटक केली होती. आता तो जामिनावर असून, त्याच्याविरोधात कठोर दोषारोपपत्र दाखल करणार नाही आणि गुन्ह्यात मदत करतो, असे सांगून डगळे याने संशयिताच्या भावाकडे २५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

Sangli News: गटांगळ्या खाणाऱ्या पुतणीला काकाने वाचवलं, पण पाय घसरला न् दोघं पुन्हा बुडाले
तक्रारदार आणि संशयिताचा भाऊ खासगी ड्रायव्हर असून आर्थिक परिस्थिती नसल्याने डगळे याला लाचेचे २ हजार रुपये पूर्वी फोन पे केले होते. तर उर्वरित २३ हजार रुपये उकळण्यासाठी डगळे याने सतत संपर्क केला. त्यानुसार डगळे याने सात हजारांची लाच घेण्यासाठी संशयिताच्या भावाला नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि पुणे रोडवर बोलावून घेतले. तत्पूर्वी त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ डगळे याने लाच स्वीकारली या वेळी त्याला एसीबीने रंगेहाथ पकडले.

विहिरीसाठी अधिकाऱ्यानं लाच मागितली, सरपंचानं कार्यालयासमोर दोन लाख रुपये उधळले

संशयित लाचखोर डगळे याची उपनिरीक्षक पदावरून बढती होऊन सहायक पोलीस निरीक्षक पदी निवड झाली होती. मात्र सात हजारांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने कारवाई करत त्यास ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे नाशिक शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी छ. संभाजीनगरात, तिसऱ्या मजल्यावरच्या घटनेनं तिघांचं आयुष्य बदललं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here