२०१६ मध्येही असंच काहीसं घडलं होतं, जेव्हा त्याने पुणे सुपरजायंट्सकडून खेळत असलेल्या महेंद्रसिंग धोनीविरुद्ध टेस्ट मॅचची फिल्डिंग लावून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने हा किस्सा सांगितला आहे.
लखनऊ आणि सीएसके यांच्यातील सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमादरम्यान इरफानने सांगितलं की, ‘महेंद्रसिंग धोनीचे भारतीय क्रिकेट संघात एक वेगळे स्थान आहे. जर आपण गौतम गंभीरबद्दल बोलत असून तर तो धोनीच्या इगोलाही आव्हान देण्यापासून मागे हटला नाही.
विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानातच भिडले; मोठी बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल
इरफान म्हणाला, ‘गौतम गंभीर हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने धोनीच्या इगोला आव्हान दिलं. २०१६ च्या आयपीएलमध्ये मला आठवतं की गंभीरने धोनीविरुद्ध टेस्ट मॅच सारखी फिल्डिंग लावली होती. त्या वर्षी मी धोनीच्या पुणे सुपरजायंट्स संघात होतो. गंभीर त्याच्या योजनेत यशस्वी झाला होता. यानंतर धोनीला मी पहिल्यांदा इतकं अस्वस्थ पाहिलं होतं. धोनीला मी जेवढा ओळखतो त्यानुसार तो नेहमीच शांत आणि बिनधास्त असतो, पण गंभीरने त्यालाही अस्वस्थ केले होते.