आपण मस्क यांची सेटलमेंट ऑफर स्वीकारली आहे, असे होथी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘हे प्रकरण भूमिका घेण्याबाबत होते. हे पैसे किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी नाही. यावरून मी बरोबर होतो हे सिद्ध झाले आहे. होथीने @skabooshka नावाने ट्विटर अकाउंट बनवले होते. तेथे त्यांनी मस्क आणि त्यांच्या कंपनीच्या दाव्यांचे तथ्य तपासले. यामध्ये ऑटोमेशन, तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे कंपनीचे दावे उघड झाले. एप्रिल २०१९ मध्ये, टेस्लाने होथीवर टेस्ला फॅक्टरी पार्किंगमध्ये एका कर्मचाऱ्यावर कार चालवल्याचा आरोप केला. होथी यांनी हे आरोप फेटाळून लावले.
कोण आहे रणदीप होथी?
मिशिगन विद्यापीठात आशियाई भाषा आणि संस्कृती या विषयात डॉक्टरेट करत असलेले रणदीप होथी टेस्लाचे टीकाकार आहेत. टेस्ला ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता आणि मार्केट कॅपनुसार जगातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. होथी यांनी २००९ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्याचे आईवडील फ्रेमोंटमध्ये राहतात. तेथे टेस्लाचा ऑटो प्लांट आहे. होथी हा एलन मस्क आणि टेस्ला यांच्यावर टीका करणाऱ्या जागतिक गटाचा भाग आहे. या गटात टेस्लाचे माजी कर्मचारी, होथीसारखे विद्यार्थी आणि इतर व्यावसायिकांचा समावेश आहे. या ग्रुपचा हॅशटॅग $TSLAQ हा आहे.
या ग्रुपचे सदस्य वेगवेगळ्या नावाने ट्विट करत असतात. होथी @skabooshka या हँडलने ट्विट करायचा. पण २०१८ मध्ये त्याची आणि त्याच्या भावाची ओळख समोर आली. त्याचा भाऊ टेस्लाच्या प्रतिस्पर्धी फोक्सवॅगनमध्ये काम करत होता. पण आता तो कंपनीशी संबंधित नाही. २०१९ मध्ये, मस्कने होथीच्या भावाच्या फॉक्सवॅगनशी असलेल्या संबंधाबद्दल ट्विट केले. यानंतर, होथी यांनी २० एप्रिल २०१९ रोजी ट्विट केले, ‘हे माझे वचन आहे. टेस्ला शून्य. एलन मस्क तुरुंगात जाणार.’, असे त्याने ट्विट केले आहे.