पुणे : अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी पालखी सोहळा येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची अलंकापुरीत रेलचेल सुरू झाली आहे. दुसरीकडे इंद्रायणी नदी पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इंद्रायणी नदीचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. शिवाय या प्रदूषित पाण्यात वारकरी स्नान करतात. तसेच इंद्रायणी नदी पवित्र म्हणून अनेक भाविक या नदीचे केमिकल युक्त पाणी देखील पिताना पहायला मिळतात. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. प्रशासनाकडून देखील याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अलंकापुरी जणू इंद्रायणीला काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली आहे. असेच म्हणावे लागेल.

इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. दुसरा कोणताही उपाय नसल्यामुळे भाविकांना याच पाण्यात आंघोळ करावी लागते. शिवाय काही ठराविक वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीला मुखवट्याला देखील इंद्रायणीच्या पाण्याने अभिषेक केला जातो. प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. आळंदी देवस्थान कमिटीने इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी पिंपरी-चिंचवड मनपा, सांडपाणी नदीत सोडणारी गावे, राज्य सरकार, केंद्र सरकार यांना पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र, संबंधितांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. हे या मागचं वास्तव आहे.

Varun Chakravarthy : टोमणे सहन केले, बोलणं ऐकलं, कॅप्टननं विश्वास टाकला,या खेळाडूनं गमावलेला सामना जिंकून दिला

यंदाच्या आषाढी वारीच्यावेळी चार ते पाच दिवस लाखो भाविक हे आळंदीत मक्कामी असतील असा अंदाज आहे. त्यावेळी त्यांना स्नान इंद्रायणी नदीत करावं लागतं. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालं आहे त्याचं महत्वाचे कारण म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कारखान्यांचे केमिकल मिश्रित पाणी होय. काही ठिकाणचे गावांचे तसेच शहरातील सांडपाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडण्यात असल्याचंही चित्र आहे. याचा वारकऱ्यांना मोठा त्रास होणार आहे. जोपर्यंत इंद्रायणीचे पाणी प्रदूषणमुक्त होत नाही, तोवर आळंदी नगरपरिषदेने इंद्रायणी घाटावर दर्शनी भागावार ‘इंद्रायणीचे पाणी पिऊ नका’ असे फलक लावणे आवश्यक आहे .

कर्णधाराच्या एका निर्णयाने अखेरच्या ओव्हरमध्ये झाला चमत्कार; विजयाचा घास हिरावून घेतला

इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या वतीने १ मेपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितलं आहे.
Pune Bypoll: गिरीश बापटांच्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या हालचाली, अधिकारी लागले कामाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here