मुंबई : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुढील आठवड्यापासून खाद्यतेलाचे दर कमी होणार आहेत. सरकारने गुरुवारी खाद्यतेल उद्योगांना त्यांच्या उत्पादनांच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) कपात करण्याचे निर्देश दिले जेणेकरून जागतिक किमतीत तीव्र घसरणीचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल. अशा स्थितीत सरकारचा सल्ला मानत खाद्यतेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती ६% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार असलेल्या भारताने विपणन वर्ष २०२१-२२ (नोव्हेंबर-ऑक्टोबर) दरम्यान १.५७ लाख कोटी रुपयांची खाद्यतेलाची आयात केली. मलेशिया आणि इंडोनेशिया येथून पामतेल खरेदी करते तर सोयाबीन तेल अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते.

Gold Price Today: सोने खरेदी महागली, १४ महिन्यांचा उच्चांक मोडला; आजचा भाव वाढवेल तुमची चिंता!
खाद्यतेल स्वस्त होणार
दरम्यान, सरकार आणि तेल कंपन्यांच्या या निर्णयानंतर फॉर्च्युन, धारा आणि जेमिनी या ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किमती २० रुपयांपर्यंत कमी होतील. त्याच वेळी, उद्योग संघटना SEA (सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया) ने सांगितले आहे की येत्या तिमाहीतही तेलाच्या किमती कमी होतील. म्हणजे देशातील गृहिणींना भविष्यात तेलाच्या किमतीत मोठा दिलासा मिळेल.

कोणते खाद्यतेल किती स्वस्त झाले?
गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मारने तेलाच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांनी कपात केली असून अदानी विल्मर फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकते. कंपनी सोया, अंबाडी, मोहरी, तांदळाचा कोंडा, शेंगदाणे आणि कापूस बियाणे तेल विकते. तर, जेमिनी एडिबल आणि फॅट्स इंडियाने प्रति लिटर १० रुपयांनी किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मदर डेअरी धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेलाच्या किमतीत तात्काळ प्रभावाने १५ ते २० रुपयांनी कपात करेल. मदर डेअरीने गेल्या वर्षी जुलैमध्ये भाव कमी केले होते.

Pension Update: नोकरदारांसाठी गुड न्यूज! उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढली, जाणून घ्या नवीन तारीख
देशातील गृहिणींना मोठा दिलासा
दरम्यान, धारा ब्रँडच्या खाद्यतेलाचा सुधारित किमतीसह नवीन स्टॉक पुढील आठवड्यापर्यंत बाजारात येण्याचे अपेक्षित असून सुमारे तीन आठवड्यांत ग्राहकांना अदानी विल्मर आणि जेमिनी एडिबलच्या किमतीत कपातीचा लाभ मिळेल.

कर्ज घेऊन फ्लॅट घेऊ नका… २० वर्षे अडकाल, भाड्याने राहण्याचा दुहेरी फायदा, असं आहे गणित
खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा सुरूच राहणार?
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे (SEA) कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता यांनी पुढील तिमाहीत खाद्यतेलाच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे, असे म्हटले. तसेच SEA चे अध्यक्ष अजय झुनझुनवाला म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत जागतिक किमतीत सातत्याने घट होत आहे. विशेषत: गेल्या ६० दिवसांत भुईमूग, सोयाबीन आणि मोहरीची बंपर पिके होऊनही देशांतर्गत भाव आंतरराष्ट्रीय बाजाराशी जुळून आलेले नाहीत. सध्याचे बाजाराची घडामोड पाहता देशांतर्गत बाजारातील भाव जास्त आहेत. अशा स्थितीत तेल कंपन्यांवर दर कमी करण्याचा दबाव वाढला होता. उल्लेखनीय आहे की गेल्या वर्षी खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत घसरण नोंदवली गेली, पण जागतिक किमतीच्या तुलनेत ही घसरण कमी आहे.

खाण्याचं तेल सतत बदला, हृदयविकार दूर ठेवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here