KDMC Water Cut News : यंदा देशात पाऊस नेहेमीपेक्षा कमी असेल, असं असा अंदाज काही खासगी संस्थांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. तर शहरांना पाणी पुरविणाऱ्या धरणांमधील जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत. मुंबई शहरासहित महामुंबई परिसरातील सर्वच शहरे वाढत्या पाणी टंचाईला सामोरी जात आहेत. आता कल्याण-डोंबिवलीचाही त्यात समावेश झाला आहे.

 

kalyan dombivli municipal corporation
कल्याण डोंबिवलीसाठी महत्त्वाची सूचना, येत्या मंगळवारपासून पाणीकपात, बघा कसा होई पाणीपुरवठा
डोंबिवली : हवामान बदलाचा फटका जगाला बसतो आहे. कुठे उन्हाची तीव्रता तर कुठे अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. याचा अनुभव गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी घेतल आहेत. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यातच यंदा मान्सून लांबण्याचे संकेत मिळत असल्याने धरणातील पाणीसाठा जपून वापरावा अशा सूचना लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. याची खबरदारी म्हणून आता राज्यातील अनेक शहरांमध्ये पाणीकपात सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतही पाणीकपात करण्यात येत आहे.धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. येत्या ९ मेपासून दर मंगळवारी पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे. सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. ही कपात ऑगस्ट अखेरपर्यंत असेल. पाणीपुरवठ्यात ३२ टक्के तूट आहे. ही तूट भरुन काढण्याकरीता ठाणे लघू पाटबंधारे विभागाने दिलेल्या आदेशानुसार उल्हास नदीतील पाणी नियोजनाकरीता पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

इस्त्रीचे कपडे द्यायला गेला, लिफ्ट बंद पडली, सहाव्या मजल्यावरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
पवासाच्या अंदाज पाहता साधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन असते. त्यामुळे१५ जुलै पर्यंत धरणातील पाणी साठा पुरेल अशा पद्धतीने लघु पाटबंधारे विभागाकडून पाणी पुरवठा वितरणाचे नियोजन करण्यात येते. बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर जुलैपर्यंत पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा असल्याने नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागला नव्हता. मात्र यंदा मान्सून लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
डोंबिवलीत खळबळ! बहिणीच्या नवऱ्याने दारू पिऊन शिव्या दिल्या, संतप्त तरुणाने काय केले पाहा
धरणातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरवण्यासाठी करिता ३२ टक्के तूट येत आहे. सदरची तूट भरुन काढण्यासाठी ठाणे लघु पाटबंधारे विभागाने दिलेल्या निर्देशानुसार उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी ९ मे पासून आठवड्यातील दर मंगळवारी २४ तास (सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पूर्व व पश्चिम, कल्याण ग्रामिण (शहाड, वडवली, आंबिवली व टिटवाळा), डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here