मुंबई : सोन्या आणि चांदीच्या दरात वाढीचे सत्र थांबण्यास नाव घेत नाहीये. गुरुवारी एकीकडे सोन्याची किंमत ऑल-टाइम हाय (सर्वकालीन उच्चांकावर) पोहोचला होता, तर आता आज चांदीच्या किमतीने नवीन विक्रमी वाढ नोंदवली. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहार सत्रात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ५ जून २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ६१,५०२ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

सोन्या-चांदीची उंच उडी
शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याची फ्युचर्स किंमत ६१,६२९ रुपयांवर पोहोचली असताना गुरुवारी सोन्याचा देशांतर्गत वायदा भाव ६१,८४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला, जी सोन्याची सर्वकालीन उच्च पातळी आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही बंपर तेजीने व्यवहार होताना पाहायला मिळत असून चांदीच्या वायदेने आज नवा उच्चांक गाठला. गुरुवारच्या सत्रात सोन्याच्या भावाने राजधानी दिल्लीत गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. दिल्लीमध्ये सोने १० ग्रॅमसाठी ९४० रुपये वाढीसह ६२,०२० रुपये किंमतीवर पोहोचले. सोन्याच्या मागणीत जगभरातून वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

वाढत्या महागाईत गृहिणीनं मोठा दिलासा; खाद्यतेलाच्या किमतीत कपात! जाणून घ्या नवीन किमती
सोन्या-चांदीच्या दरातील तेजीचे कारण काय?
मौल्यवान सोन्या आणि चांदीच्या दरातील तेजीचा थेट संबंध अमेरिकेशी आहे. अमेरिकेतील वाढत्या व्याजदराच्या परिणामी मौल्यवान धातूंचे दर वाढत आहेत. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने बुधवारी रात्री प्रमुख व्याजदरात ०.२५% वाढ केली, ज्यामुळे सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतली. त्याच वेळी, अमेरिकेतील वाढत्या बँकिंग संकटामुळे डॉलरमध्ये घसरण होताना दिसत असून सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यास बळ मिळत आहे.

Higher Pension: कंपनी की कर्मचारी, कोण देणार अतिरिक्त योगदान? पाहा तुमच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर
चांदीचा नवीन उच्चांक
चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतींनी शुक्रवारी नवीन उच्चांक गाठला. MCX वर ५ जुलै रोजी डिलिव्हरीसाठी असलेली चांदी सकाळपासून वाढीसह व्यवहार करत आहे. व्यवहार दरम्यान चांदीची किंमत ७८ हजार २९२ रुपये प्रति किलोवर पोहोचली, जी त्याची नवीन सर्वकालीन उच्च पातळी आहे.

सोन्याची जागतिक किंमत
शुक्रवारी सकाळी सोन्याच्या जागतिक किमतीत थोडीशी घसरण झाली असून कॉमेक्सवर सोन्याची जागतिक वायदा किंमत ०.०१% किंवा $०.३० कमी होऊन $२,०५५.४० प्रति औंसवर व्यापार करत होती. तर सोन्याची जागतिक स्पॉट किंमत ०.१२% किंवा $२.४३ ने घसरून $२,०४७.८५ प्रति औंस झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here