पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या पक्षांतर्गत नाट्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे. आज जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त पुण्यात व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी रेखाटलेले एक व्यंगचित्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. पुण्यातील बालगंधर्व येथे युवा संवाद संस्थे मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांना व्यंगचित्र रेखाटण्याची विनंती आयोजकांनी केली. तेव्हा राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले.

शरद पवार साहेबांसाठी तीन दिवस ठाण मांडून बसला, संयम संपला; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर पक्षाचे नेते तसेच कार्यकर्ते हे भावनिक झाल्याचं पाहायला मिळाले. यानंतर अजित पवार यांचे वेगळेच सूर पाहायला मिळत होते. अजित पवार हे शरद पवारांच्या निर्णयाची सहमत असल्याचं पाहायला मिळत होते. शरद पवारांच्या घोषणेनंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अजित पवार गप्प करत होते. ‘ए तू चूप बस, ए तू खाली बस’ असे म्हणत सगळ्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी एक-एक करुन शांत बसवले. अजित पवारांची यांची ही भूमिका सगळ्यांची भुवया उंचावणारी ठरली होती. तेव्हापासून अजित पवार यांच्या कृतीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून अजित पवार यांना लक्ष्य केलं.

Sharad Pawar : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, निवड समितीनं राजीनामा फेटाळला, आता पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज मी पुण्यावरून रत्नागिरीला जाणार होतो. पण आज जात असताना माझे मित्र चारुदास पंडित याने मला मध्येच टोल भरायला लावला आहे.जागतिक व्यंगचित्र दिवस म्हटल्यावर आज येणं स्वाभाविक होते. इथे जगभरातील व्यंगचित्र असून ते आज मी इथ आल्यावर पाहत होतो.व्यंगचित्र पाहिलं की माझे हात शिवशिवतात, पण वेळ आणि बैठक न भेटत असल्याने ती व्यंगचित्र माझ्या भाषणातून पुढे येतात. त्या दिवशी मला कोणीतरी प्रश्न विचारलं की राजकारण की व्यंगचित्र तर मी म्हणालो की व्यंगचित्र कारण मी व्यंगचित्रांमध्ये रमणारा माणूस आहे, असे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here