बीड : पाच महिन्यापूर्वी थाटामाटात लग्न झालं. त्यानंतर संसार देखील सुरू झाला. मात्र, पाच महिन्यानंतर प्राध्यापक पतीने ‘हुंड्याचे ५ लाख ठरले होते. लग्नात दोनच लाख दिले. बाकी ३ लाख घेऊन ये, नाहीतर परत येऊ नकोस’ असं म्हणत पत्नीचा छळ सुरू केला. यात मोठ्या सुखी संसाराचे स्वप्न बघितलेल्या मुलीचे स्वप्नभंग झाले. पैशासाठी आपला नवरा आणि घरातील मंडळी आपला छळ करत असल्याचं तिने सहन केलं. अशात घराची साफसफाई सुरू असताना पीडित महिलेला अशी काही कागदपत्रं सापडली की तिच्या पायाखालची जमिन सरकली.यानंतर आपल्या संसाराचा खेळखंडोबा होत असल्याने मुलीने आपलं माहेरघर गाठून चकलांबा पोलीस ठाण्यात पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर तिने पोलिसांना असं काही सांगितलं की सगळ्यांनीच डोळे मोठे केले.

Navi Mumabi Crime: खबर येताच पोलिसांनी टाकला छापा; गाळ्यात होते खूप बॉक्स, एक-एक करून उघडताच हादरले…
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील चकलांबा गावातील एका तरुणीचा धाराशिव येथील एका प्राध्यापक मुलाशी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी विवाह झाला. हे लग्न जमवण्यावेळी प्राध्यापक पतीने मुलीच्या वडिलांना हुंडा म्हणून ५ लाखाची मागणी केली. हे मुलीच्या वडिलांनी मुलीच्या सुखी संसारासाठी मान्य देखील केलं. पण लग्नात होणारा खर्च आणि हुंडा हे समीकरण जुळत नसल्याने मुलीच्या वडिलांनी लग्नात २ लाख दिले आणि नंतर बाकी राहिलेले पैसे देऊ असं म्हणून हा विवाह मोठ्या थाटात पार पाडला.

लग्नाच्या ५ महिन्यानंतर पतीने ३ लाख राहिल्याने पत्नीचा छळ सुरू केला. अनेक कारणांवरून तिची मारहाण सुरू केली. यावर मुलीनेदेखील त्यांना खूप समजवलं पण अखेर तिला हा त्रास असह्य झाला. ही घटना घरी सासू-सासर्‍यांना सांगितल्यानंतर त्यांनी देखील सुनेला जबाबदार ठरवून शिवीगाळ करत मारहाण केली. या सगळ्यात संसार टिकवण्यासाठी मुलीने शांत राहून त्यांचा अत्याचार सहन केला. पण लग्न झाल्यापासून पती आपल्याला कसलंही सुख देत नाही. त्यात शारीरिक सुख तर लांबच पण पती जवळही येत नव्हता. तो रोज दारू पिऊन घरी यायचा.

Mumbai Crime: मुंबईच्या हत्या-अपहरण प्रकरणात मोठा खुलासा, मालमत्तेसाठी माय-लेकाची सुपारी; ऑफर ऐकून झोप उडेल…
सगळ्यात भयंकर म्हणजे पत्नीने कोणालाही माहिती देऊ नये यासाठी पतीने घरामध्ये मोठी हत्यारं आणून ठेवली होती. अशात पीडित पत्नी घरातील साफसफाई करत असताना तिला धक्कादायक कागदपत्र हाती लागले. सगळी कागदपत्रं वाचल्यानंतर ती हादरूनच गेली. कारण, पती मानसोपचार तज्ञाच्या गोळ्या आणि ट्रिटमेंट घेत असल्याचं उघड झालं. इतकंच नाहीतर तो नपुंसक असून त्याचादेखील उपचार चालू असल्याचे कागदपत्र या मुलीला घरात आढळून आले.

यानंतर सासरच्या लोकांनी आपली सपशेल फसवणूक केल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने आपल्या आईसह नातेवाईकांना या सर्व प्रकारची माहिती दिली. यावरून माहेरी येऊन मुलीने आपल्या पतीसह सासू, सासरे, नंदा, दीर अशा ७ जणांवर फसवणूक आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे सध्या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Solapur Crime: सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here